प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने त्यांच्या जयंती दिनी महाराष्ट्रभर लोकप्रबोधन दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. संभाजी ब्रिगेड शिवसेना मूर्तिजापूर टीमने प्रबोधनकार ठाकरे जयंती निमित्त त्यांना अभिवादन करून करून लोकप्रबोधन दिन साजरा केला.
यावेळी शिवसेना शहर प्रमुख विनायक भाऊ गुल्हणे, संभाजी ब्रिगेड विभागीय कार्याध्यक्ष संजय भाऊ गुप्ता, मराठा सेवा संघ तालुका प्रमुख गजानन पाटील बोर्डे माजी जिल्हा परिषद सदस्य अप्पू दादा तिडके, जगदेवराव छबिले, बंडू पाटील लांडे, प्रा.प्रमोद ठाकरे सर, प्रमुख वक्ते अनिकेत महल्ले, संभाजी ब्रिगेड ता.कार्याध्यक्ष उज्वल ठाकरे, ता.सचिव पवन तळोकार,शहर अध्यक्ष हितेश ठाकरे, प्रा.सुनील वानखडे,
अर्णव काणकीरड, मयूर गावंडे, वैभव वानखडे, हर्षल जाधव, मनोज कांबळे,अतिष पवार,अजय सोनोने व संभाजी ब्रिगेड शिवसेना मूर्तिजापूर टीम उपस्थित होती. यावेळी प्रबोधनकार ठाकरे यांचा जयघोष करून संभाजी ब्रिगेड व शिवसेना युतीचा आनंद साजरा करून संभाजी ब्रिगेड व शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.