Sunday, October 13, 2024
Homeराज्यपारशिवनी | श्री. चंद्रकांत इंगळे यांच्या शेतात आज वाघाने केला हल्ला...

पारशिवनी | श्री. चंद्रकांत इंगळे यांच्या शेतात आज वाघाने केला हल्ला…

राजु कापसे
रामटेक

पेठ पारसोड़ी, तालुका पारशिवनी येथील रहिवासी ४५ वर्षीय श्री. चंद्रकांत इंगळे यांच्या शेतात आज वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. पुढील वैद्यकीय उपचारांसाठी त्यांना मेडीट्रीना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच नागपूर वनविभागाचे उपविभागीय वन अधिकारी श्री. भारतसिंग हाडा, सहायक वन संरक्षक श्री. रवी घाडगे आणि वन क्षेत्र अधिकारी श्री. ए. बी. भगत यांनी तत्काळ रुग्णालयात भेट दिली आणि जखमींच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली.

या दुर्दैवी घटनेची तात्काळ दखल घेऊन वनविभागाने पुढील कार्यवाही सुरू केली आहे. जंगलातील वाघांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी गस्त वाढवली आहे. तसेच, स्थानिक नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वनविभाग नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व पावले उचलत आहेत.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: