Sunday, October 13, 2024
Homeराज्यआदिवासी भागातील जंगली मशरुमला (रान मेवा..) शहरात मागणी...

आदिवासी भागातील जंगली मशरुमला (रान मेवा..) शहरात मागणी…

रामटेक – राजु कापसे

रामटेक – आदिवासी भागातील जंगली मशरुमला रामटेक किंवा नागपुरात मोठी मागणी आहे सदर भागातील नागरीक हे मोठ्या मेहनतीने जंगतालुन हे मशरुम काढुन गावाकडे किंमत मिळत नसल्याने शहराकडे नेवुन विकतात.

आदिवासी भागातील नागरीकांना या भागात रोजगाराचे साधन उपलब्ध नसल्याने त्यांना उपजिवीका करण्यासाठी सर्वात प्रथम हे नागरीक मोहफुल वेचुन गोळा करणे व विकणे, त्यांचा दुसरा हंगाम म्हणजे, तेंदुपत्या संकलन करणे हे दोन मुख्य हंगाम आहे तर तिसरा हंगाम आहे तो जंगली मशरुम पण हा हंगाम मोठा नसुन सर्वांना काम मिळत नाही.

पावसाळ्याच्या आषाढ महिण्यात या रानमेवा हंगाम असतो,या हंगामातच हे रानमेवा निघतात रानमेवा हे डुंबरावर निघत असल्याने याला या भागात डुंबरभेंडी, तर आदिवासी भागात याला भोमोळी, केकोळी, भोमोडी, असे म्हणतात. रानमेवा ही डुंबरावर उगवते. डुंबरावर साप असतात असा सामान्य माणसाचा समज असतो परंतु ज्या डुंबरावर रानमेवा असते त्या डुंबरात साप नसतो असे रानमेवा विकणारे सांगतात.

सदर रानमेवा..काढण्यासाठी ती आधी पाहुन ठेवावी लागतात लहान असते तेव्हा ती कोवळी असते तिला भाव मिळत नाही तर उशिरा काढल्या जरड झाल्याने ती पण विकल्या जात नाही परंतु काढुन ठेवलेली रानमेवा दोन दिवसापर्यत व्यवस्थित राहु शकते असे विकणारे सांगतात.

सदर व्यवसाय हा क्वचितच नागरीक करतात सदर रानमेवा ही हंगामी खाद्य वस्तु असल्याने दुकानात ग्राहकांची गर्दी असते.. मागील वर्षी ५०० रुपये किलो प्रमाणे विक्री होणारी जंगली अ ळं बी या वर्षी १२०० रुपये ते १८०० किलो प्रमाणे बाजारात विक्री होत आहे.

या मागचे कारण विक्रेते यांना विचारले असता त्यांनी सांगितले पर्यावरणा मध्ये होणाऱ्या बदलमुळे या वर्षी जंगल भागात यांची उघवन दिसत नाही… त्या मुळे आम्ही भंडारा जिल्हा येथून विक्री साठी आम्ही आणत आहो… त्या मुळे आदिवासी भागातील लोकांनाचा व्यवसाय सद्या तरी बंद झाला आहे… सद्या रामटेक तालुक्यात जी मशरूम ची विक्री होत आहे ती दलाल विक्रते हे इतर जिल्ह्यातून विकत आणून ते विकत आहे.

आरोग्याला फायदेशीर

मशरूम खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मशरूममध्ये अत्यंत कमी कॅलरी असतात. सोबतच त्याच्यात अनेक पोषणतत्व असतात. मशरुम करी, सलाड, सूप आणि भाजी बनवूनही खाता येतं. इतकंच नाही, तर मशरूम स्नॅक्स म्हणूनही खाता येतात. विशेष म्हणजे मशरूम अनेक आजारांवर एखाद्या औषधापेक्षा कमी नाहीये. कर्करोगाशी निगडीत गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. प्रोस्टेट कर्करोगाचा धोका कमी होतो.असे जानकार व्यक्ती सांगतात.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: