Sunday, October 13, 2024
Homeराज्यपंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा; ३५ उमेदवारांची अंतिम निवड...

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा; ३५ उमेदवारांची अंतिम निवड…

अमरावती – दुर्वास रोकडे

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर अमरावती व शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावती यांचे संयुक्त विद्यमाने शनिवार दि. 3 ऑगस्ट रोजी दृक-श्राव्य सभागृह, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे पंडित दीनद्याल उपाध्याय महिला रोजगार मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात या नांमाकित कंपनीमध्ये 35 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.

उमेदवार रोजगार मेळाव्यामध्ये ऑनलाईन, ऑफलाईन असे एकुण 1700 उमेदवारांनी सहभाग नोंदवून त्यापैकी 600 उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखती दिल्या. मुलाखती दिलेल्या उमेदवारांपैकी 310 उमेदवारांची प्राथमिक व 35 उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली. मेळाव्याकरिता जिल्ह्यातील आणि इतर जिल्ह्यातील उमेदवार उपस्थित राहून मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, कौशल्य विकास कार्यालयाव्दारे बेरोजगार उमेदवारांकरीता विविध उपक्रम राबविण्यात येवून उमेदवारांना रोजगार स्वयंरोजराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम अतिशय चांगल्या प्रकारे कौशल्य विकास कार्यालय तसेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ करत आहेत. याचा लाभ सर्व उपस्थित उमेदवारांनी घ्यावा व उपस्थित उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांची नियुक्ती झाली नाही. त्यांनी निराश न होता. नव्याने पुन्हा सुरूवात करावी. तसेच नव्याने सुरू झालेली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा सुध्दा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहेत.

कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन केले. उमेदवारांनी नुसते नोकरीच्या मागे न लागता आपल्यामध्ये कौशल्य विकास कसा होईल याकडे लक्ष द्यावे. तसेच उपलब्ध असलेले विविध अल्प कालावधी कोर्सेस करावे, असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र व शासकिय औद्यौगिक प्रशिक्षण संस्थाचे अधिकारी व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: