Saturday, July 13, 2024
spot_img
Homeराज्यखासदार अनुप धोत्रे ॲक्शन मोडवर : उपोषणाची सांगता…

खासदार अनुप धोत्रे ॲक्शन मोडवर : उपोषणाची सांगता…

मालेगांव (वाशिम) – चंद्रकांत गायकवाड

मालेगाव येथील तहसील कार्यालय समोर १० जुलै २०२४ मालेगाव शहरातील प्रभाग क्रमांक १२,१४ आणि १७ मधील रस्त्यांच्या निष्कृष्ट कामाविरोधात सुरू असलेल्या उपोषणाची आज सांगता झाली. भाजपा कार्यकर्ते सुनिल श्रीरामजी शर्मा यांनी सुरू केलेल्या या उपोषणाला दोन दिवस झाले असता, खासदार अनुप धोत्रे ॲक्शन मोडवर येत त्यांनी त्वरित दखल घेतली खासदार धोत्रे यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना फोन करून तातडीने आदेश दिले त्यांनी सांगितले की, संबंधित रस्ता दोन दिवसांमध्ये चालू होणार असून त्यावर तीन इंची कोट सिमेंट काँक्रेट टाकण्यात येणार आहे.

या उपोषण सोडवण्याच्या कार्यक्रमात अकोला लोकसभेचे खासदार अनुप भाऊ धोत्रे यांच्या हस्ते उपोषणकर्त्याला मँगो ज्यूस देऊन उपोषण सोडण्यात आले या कार्यक्रमाला प्रदेश सदस्य शंकरराव बोरकर,जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भाऊ मुंढे,तालुका अध्यक्ष गजानन नवघरे,तानाजी पाटील, प्रविण पाटील वायकर अजय अंभोरे कपिल दरणे उमेश तारे अतुल शर्मा बबलू शेख प्रकाश यादव कैलास बनसोड आझाद पठाण रशीद शेख गजानन काळे पाटील,डॉ.उमेश तारे,संतोष भाऊ तिखे,राजू सांगळे, आणि अन्य भाजप कार्यकर्ते उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीत उपोषणाची सांगता करण्यात आली

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: