Saturday, July 13, 2024
spot_img
HomeBreaking NewsUnnao Accident | लखनऊ-आग्रा एक्सप्रेस वेवर भीषण अपघात…१८ जणांचा मृत्यू…

Unnao Accident | लखनऊ-आग्रा एक्सप्रेस वेवर भीषण अपघात…१८ जणांचा मृत्यू…

Unnao Accident : उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात बुधवारी सकाळी लखनौ-आग्रा एक्स्प्रेस वेवर भीषण रस्ता अपघात झाला. डबल डेकर बसची टँकरला धडक. धडकेनंतर बस महामार्गावर अनेक वेळा उलटली. या भीषण अपघातात 18 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला, तर 19 हून अधिक प्रवासी जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डबल डेकर बस (UP95 T 4720) बिहारमधील शिवगढ येथून राजधानी दिल्लीला जात होती. लखनौ-आग्रा एक्स्प्रेस वेवरील बेहता मुजावर पोलीस स्टेशन हद्दीतील हवाई पट्टीवर स्लीपर बस पोहोचताच दुधाने भरलेल्या टँकरला धडकली.

ही धडक इतकी जोरदार होती की बस एका बाजूने चक्काचूर झाली. ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी मृतदेहांचा ढीग होता. रस्त्यावर फक्त मृतदेह दिसत होते. घटनास्थळी आरडाओरडा झाला. या अपघातात एक बालक आणि महिलांसह 18 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर 20 प्रवासी गंभीर जखमी आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले.

बसचा वेग जास्त असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. स्लीपर बसचे नियंत्रण सुटून टँकरला धडकल्याने हा भीषण अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हा अपघात एवढा भीषण होता की घटनास्थळी उपस्थित असलेले लोक ते पाहून भयभीत झाले.

लखनौ-आग्रा एक्स्प्रेस वेवर बेहता मुजावर पोलीस स्टेशन हद्दीतील गढा गावासमोर झालेल्या अपघातानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्याचवेळी पोलिसांनी काही मृतांची ओळख पटवली आहे. उन्नावचे जिल्हा अधिकारी गौरांग राठी यांनी सांगितले की, दिल्लीला जाणाऱ्या एका खासगी बसमध्ये सुमारे 57 प्रवासी प्रवास करत होते. पहाटे 5.15 वाजता बस दुधाच्या कंटेनरला धडकल्याने 18 जणांचा मृत्यू झाला तर 19 जण जखमी झाले. सुमारे 20 लोक सुरक्षित असून त्यांना दिल्लीला पाठवण्यात येत आहे.

सहा जणांना ट्रॉमा सेंटरमध्ये रेफर करण्यात आले असून, उर्वरितांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आमच्याकडे उपचारासाठी पुरेशी व्यवस्था आहे आणि आम्ही शक्य तितक्या लवकर सर्व आवश्यक कार्यवाही करू.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: