मूर्तिजापूर – नरेंद्र खवले
मूर्तिजापूर – वातावरणातील बदल पाहता वृक्ष लागवड करून त्याचे संगोपण करणे हि काळाजी गरज आहे यासाठी सामाजिक वनीकरण विभाग अकोला परिक्षेत्र मूर्तिजापूर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात अमृत वृक्ष विक्री केंद्राचे उद्घाटन महेश खोरे,विभागीय वनाधिकारी यांच्या हस्ते आज दिनांक २ जुलै रोजी करण्यात आले.
शासन स्तरावरून सामाजिक वनीकरण विभाग यांच्या वतीने वन महोत्सव हा राज्यभर साजरा होत असताना अकोला जिल्हा सामाजिक वनीकरण विभाग परिक्षेत्र मूर्तिजापूर यांच्यावतीने सुद्धा साजरा करण्यात येत आहे यामाध्यमातून ” अमृत वृक्ष आपल्या दारी ” हे घोषवाक्य घेऊन मूर्तिजापूरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अमृत वृक्ष विक्री केंद्राचा श्री गणेशा आज महेश खोरे, विभागीय वनाधिकारी यांच्या हस्ते एका ग्राहकाला सवलतीच्या दरात वृक्ष देऊन करण्यात आला.
या विक्री केंद्रामध्ये लागवडी उपयुक्त वृक्ष ठेवले असून ते सवलतीच्या दरात मिळणार असून विक्री केंद्र कार्यालयीन वेळेत सेवेसाठी तत्पर असणार आहे यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त वृक्ष सवलतीच्या दरात खरेदी करून त्याची लागवड करत त्याचे संगोपण करावे जेणे करून पुढे निसर्ग हा आपल्यावर रुसणार नाही आणि येरे येरे पावसा म्हणण्याची वेळ येणार नाही व उन्हाची काहली सहन करावी लागणार नाही यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी या वनमहोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन विभागीय वनाधिकारी महेश खोरे व वन परिक्षेत्र अधिकारी मूर्तिजापूर संगीता कोकणे यांनी केले आहे.
उद्घाटन प्रसंगी विभागीय वनाधिकारी महेश खोरे, वनपरिक्षेत्र अधिकारी संगिता कोकणे, वनपाल डी.ए सकडे, वनरक्षक चंदू तायडे , वनमजूर डी.गी.पुरी यांच्या सहकार्यालयीन कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.