Sunday, October 13, 2024
Homeराज्यशीतला माता मंदिर पुनर्निर्माणसाठी आमदार जयस्वाल यांचा पुढाकार...

शीतला माता मंदिर पुनर्निर्माणसाठी आमदार जयस्वाल यांचा पुढाकार…

राजु कापसे प्रतिनिधी

रामटेक:- शहराचे ग्रामदैवत असलेल्या शीतला माता मंदिराच्या पुनर्निर्माणसाठी आमदार ॲड आशिष जयस्वाल यांनी पुढाकार घेऊन रामटेक येथिल ग्रामदैवत शितलामाता मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले होते. दि .१६ सप्टेंबर रोजी या मंदिराचे उद्घाटन आमदार आशिष जयस्वाल व आ. कृपाल तूमाने यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच आमदर जयस्वाल मां भगवती जागरण सोहळा उपस्थित राहून सर्व भाविक भक्तांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी जिल्हा नियोजन समिती सदस्य नरेश धोपटे, माजी सभापती बिकेंद्र महाजन, शिवसेना रामटेक शहर प्रमुख राजेश किंमतकर, पी. टी. रघुवंशी, सुमित कोठारी, शितलामाता मंदिर संस्थेचे अध्यक्ष वसंता अहिरकर, उपाध्यक्ष दिलीप ताकोद, सचिव वसिष्ठ ताकोद, सदस्य रामप्रसाद बर्वे, माणिक ताकोद, योगेश दूधबर्वे, प्रकाश मोरेशिया, आकाश अहिरक, गोविंद मोरेशीया, विलास अहिरकर, बबलु अहिरकर सह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: