Friday, September 20, 2024
Homeराज्यदेगलूर बिलोलीत जोमाने कामाला लागा शिवसेनेचे उपनेते खा. हेमंत पाटील यांनी दिला...

देगलूर बिलोलीत जोमाने कामाला लागा शिवसेनेचे उपनेते खा. हेमंत पाटील यांनी दिला मंगेश कदम यांना आशीर्वाद..!

नांदेड – महेंद्र गायकवाड

देगलूर बिलोली विधानसभा मतदार संघांचे शिवसेना (शिंदे)गटाचे इच्छुक उमेदवार बहुजन नेतृत्व मंगेश कदम यांनी नुकतीच शिवसेनेचे उपनेते खा. हेमंत भाऊ पाटील यांच्या निवास्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली असता हेमंत पाटील यांनी मंगेश कदम यांना देगलूर बिलोली विधानसभा मतदार संघात जोमाने कामाने लागा आमचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे. असे मत व्यक्त केले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उत्तर विधानसभा मतदारसंघांचे आ. बालाजीराव कल्याणकर, शिवसेना उपनेते खा. हेमंत पाटील व शिवसेना संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली बहुजन नेतृत्व मंगेश कदम यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देत नुकताच बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला.

पक्ष प्रवेशानंतर पहिल्यांदाच मंगेश कदम यांनी शिवसेनेचे उपनेते खा. हेमंत पाटील यांच्या निवास्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले असता हेमंत पाटील यांनी मंगेश कदम यांचा पुष्पगुच्छ व भगवी शाल देऊन सत्कार केला व देगलूर – बिलोली मतदार संघात जोमाने कामाला लागा असा आशीर्वाद रुपी सल्ला दिला.

या प्रसंगी मंगेश कदम यांच्या सोबत बिलोलीचे माजी नगरसेवक महेंद्र गायकवाड, शिवसेना उपजिल्हा प्रमुख सचिन किसवे,वैभव धनवे,मुकिंदर कुडके, अँड. धम्मपाल कदम,संतोष पाटील पवार , विक्की गायकवाड, शेख उबेद, बबलू पटेल,गौतम गुंटुरकर,उद्देश बरबडेकर, यांच्या सह शिवसेनेचे असंख्य कार्यकते उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: