Friday, September 20, 2024
Homeगुन्हेगारीउजळाईवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ...

उजळाईवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ…

कोल्हापूर प्रतिनिधी राजेंद्र ढाले

उजळाईवाडी (ता.करवीर) येथील शिवपार्वती नगर येथील विमानतळ रोडवरील संभाजी नानासाहेब देसाई (वय ५८) यांच्या बंद असलेल्या घरांचा कडी कोयंडा उचकटून लाकडी कपाट व तिजोरीतील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा दोन लाख दहा हजार पाचशे रुपयाचा ऐवज चोरला.

यामध्ये तीन तोळ्याचा सोन्याचा नेकलेस, प्रत्येक पाच ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या, सोन्याचे एक तोळ्याचे ब्रेसलेट ,सोन्याची नथ, दोन चांदीचे ब्रेसलेट, चांदीचा गणपती व रोख पन्नास हजार रुपये असा ऐवज चोरट्यांने चोरला असुन चोरीची नोंद नजीकच्या गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात झाली आहे सदर घटनेचा तपास खेळ कॉन्स्टेबल कांबळे करीत आहेत

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: