Saturday, December 21, 2024
Homeराज्यजिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतला पातुर पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायतीचा...

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतला पातुर पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायतीचा आढावा…

घरकुल एसबीएम 15 वित्त आयोग मनरेगा कामांचा घेतला आढावा

पातुर – निशांत गवई

पंचायत समितीमध्ये आज दिनांक 3 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिवार साहेब यांनी भेट देत पातुर तालुक्या अंतर्गत पूर परिस्थिती चा आढावा व पातुर पंचायत समिती अंतर्गत विविध ग्रामपंचायती मध्ये घरकुल विषयक 15 वित्त आयोग कामे एसबीएम व मनरेगा अंतर्गत होत असलेल्या कामाचा घेतला आढावा,

यामध्ये त्यांनी पिंपळ डोळी ग्रामपंचायतला भेट देऊन विविध विकास कामांचा आढावा घेतला यामध्ये त्यांनी कामांमध्ये समाधान व्यक्त करत विविध उपाय योजना सुचविल्या व यासह ग्रामपंचायतला भेट देत समस्या जाणून घेतल्या यावेळी गटविकास अधिकारी इंगळे मॅडम विसर अधिकारी लव्हाळे ग्रामसेवक नारायण घुगे मनरेगा विभागाचे पीटीओ आगे ताले जयस्वाल यासह पिंपळ डोळी गावचे सरपंच गंगासागर दिलीप ताजणे सदस्य अक्षय देशमुख बबलू व गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दौऱ्यामध्ये सहाय्यक कार्यक्रमाधिकारी रितेश सोनवणे गैरहजर, पातुर तालुक्याला पूर्णवेळ एपी येऊ द्या अशा अनेक मागण्या गेल्या वर्षभरापासून पंचायत समिती पातुर येथे होत आहेत परंतु त्याला केराची टोपली दाखवली जात आहे व वरिष्ठ सुद्धा त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही त्याच्याच उदाहरण आज मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दौऱ्यात सुद्धा एपीओ हजर नसल्यामुळे सिद्ध झाले

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: