Plane Crash : अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये विमान कोसळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. असे सांगण्यात आले की विमान महामार्गावर आपत्कालीन लँडिंग करण्याचा प्रयत्न करत होते परंतु ते एका कारला धडकले. यानंतर विमानाला आग लागली त्यामुळे महामार्गावर जाम होता.
विमान अचानक रस्त्यावर पडले
मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम फ्लोरिडामध्ये एक छोटे विमान महामार्गावर आपत्कालीन लँडिंग करण्याचा प्रयत्न करत होते, मात्र दुसऱ्या वाहनाला धडकल्यानंतर त्याला आग लागली आणि ते पूर्णपणे जळून खाक झाले. या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की काही सेकंदात विमानाने कारचा चक्काचूर केला. काही चालकांनी विमान खाली येताना पाहून स्वतःला त्यापासून दूर केले आणि आपला जीव वाचवण्यात यश मिळवले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, ते एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखे वाटत होते. आम्ही आमच्या मृत्यूपासून अगदी काही इंच दूर होतो, नाहीतर आम्हीही त्याला बळी पडलो असतो.
हे बॉम्बार्डियर चॅलेंजर 600 जेट विमान असल्याचे सांगण्यात आले. हे विमान कोलंबस, ओहायो येथील ओहायो स्टेट युनिव्हर्सिटी येथून नेपल्सला जात होते, त्यात पाच जण होते. अपघातापूर्वी पायलटने एटीसीशी संपर्क साधून विमानाचे इंजिन बिघडल्याची माहिती दिली होती. पाच जणांपैकी तिघांना जिवंत वाचवण्यात यश आले पण दोघांचा मृत्यू झाला आहे.
Omg 🚨 2 dead in plane crash on I-75 in Naples: officials
— 𝗖𝗮𝗽𝘁 𝗠𝗮𝗷𝗲𝗱 (@Capt__Majed) February 10, 2024
Massive plane crash:
Private aircraft crashes into car on I-75 near Naples – massive delays
A small plane crashed on the I-75 in Collier County near Pine Ridge Rd, in Florida.
Authorities say the plane crashed into a… pic.twitter.com/n7FSnOwU4h
या अपघातानंतर महामार्गावर बराच वेळ जाम झाला असून अग्निशमन दलासह पोलिसांच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्याचे काम सुरू केले. आता या अपघाताचे नेमके कारण काय होते, याचा शोध घेण्यात येत आहे. या अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.