Saturday, September 21, 2024
Homeदेशकिरेन रिजिजू यांच्याकडून कायदा मंत्रालय हिसकावले…अन अर्जुन राम मेघवाल यांना दिले…कारण?…

किरेन रिजिजू यांच्याकडून कायदा मंत्रालय हिसकावले…अन अर्जुन राम मेघवाल यांना दिले…कारण?…

मोदी सरकारमध्ये विविध खात्यांच्या जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या किरेन रिजिजू यांच्याकडून कायदा मंत्रालय हिसकावण्यात आले आहे. या मंत्रालयाची जबाबदारी आता अर्जुन राम मेघवाल यांच्याकडे सोपवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, किरेन रिजिजू यांच्याकडे आता पृथ्वी विज्ञान मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आल्याचे वृत्त आहे. त्याचबरोबर मेघवाल यांच्याकडे कायदा राज्यमंत्री म्हणून स्वतंत्र कार्यभार देण्यात आला आहे. विशेष म्हणजे मेघवाल हे आधीच सांस्कृतिक मंत्रालयात राज्यमंत्री पदावर आहेत.

किरेन रिजिजू हे अरुणाचल प्रदेशचे आहेत. गेल्या काही काळापासून ते निवृत्त न्यायमूर्तींबाबत केलेल्या टिप्पणीमुळे चर्चेत आहेत. किरेन रिजिजू यांनी कॉलेजियम व्यवस्थेबाबतही म्हटले होते की, देशात कोणीही कोणालाही इशारा देऊ शकत नाही. देशातील प्रत्येकजण संविधानानुसार काम करतो. याशिवाय त्यांनी काही तिखट टिप्पणीही केली होती.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: