छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे बुधवारी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १० जवान शहीद झाले. सोबत चालकाचाही मृत्यू झाला आहे. सर्व जवान डीआरजी (जिल्हा राखीव गार्ड) चे आहेत. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांच्या उपस्थितीच्या माहितीवरून जवान सर्चींगसाठी निघाले असता नक्षलवाद्यांनी पोलीसांच वाहन दिसताच क्षणी आयईडीचा स्फोट केला यामध्ये 10 जवान शहीद झाले. एक अन्य ठार झाल्याची माहिती मिळाली आहे.
ही घटना अरणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. हे सैनिक खासगी वाहनाने निघाल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात वाहन चालकाचा मृत्यू झाला आहे. हल्ल्यानंतर जवानांकडूनही प्रत्युत्तराची कारवाई करण्यात आली. यात काही नक्षलवादीही जखमी झाले आहेत. मात्र, या घटनेबाबत अधिकाऱ्यांकडून अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही.
या घटनेला दुजोरा देत मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी शोक व्यक्त केला. या प्रकाराची माहिती असून ते दुःखद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. हा लढा शेवटच्या टप्प्यात सुरू असून नक्षलवाद्यांना कोणत्याही किंमतीत सोडले जाणार नाही. आम्ही नियोजनबद्ध पद्धतीने नक्षलवाद संपवू.
दंतेवाडा येथील अरनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माओवादी कॅडरच्या उपस्थितीच्या माहितीवरून नक्षलविरोधी मोहिमेसाठी आलेल्या डीआरजी दलावर झालेल्या आयईडी स्फोटात आमचे 10 डीआरजी जवान आणि एक चालक शहीद झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे.