Saturday, September 21, 2024
Homeगुन्हेगारीअकोला | उतावळा नवरा...लग्नाआधीच भावी पत्नीला घेऊन पळाला...भावी जावयाविरूद्ध गुन्हा दाखल...

अकोला | उतावळा नवरा…लग्नाआधीच भावी पत्नीला घेऊन पळाला…भावी जावयाविरूद्ध गुन्हा दाखल…

अकोला शहरातून एका उतावळ्या जावयाने लग्नाआधीच मुलीला घेवून पळाल्याची घटना अकोट फैल भागात घडली असून त्या भावी जावयाविरुद्ध अकोट फैल पोलिसात मुलींच्या कुटुंबांनी तक्रार दाखल केली आहे. भावी जावाई अमरावती येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

अकोट फैल भागात राहणाऱ्या एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या अल्पवयीन मुलीचा साखरपुडा अमरावती येथील एका युवकासोबत झाला होता. परंतु मुलीचे वय कमी असल्याने, त्यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये लग्न ठरविले. मुलीचे वय १७ वर्ष ६ महिने होते, जानेवारी महिन्यात मुलीचा साखरपुडा आटोपला आणि कुटूंबियांनी १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर नोव्हेंबर २०२३ मध्ये त्यांचा विवाह निश्चित केला. परंतु भावी जावयाने त्यापूर्वीच मुलीला काही कारणास्तव फूस लावून पळवून नेले.

मुलीसोबत भावी जावयाचे फोनवर नियमित बोलणे व्हायचे. दरम्यान मुलीला बरे वाटत नसल्याने, अमरावती येथील भावी जावई २५ मार्च रोजी मुलीला भेटण्यासाठी घरी आला. जावई म्हणून सासुनेही आदरातिथ्य केले. सासुला काही काम असल्यामुळे ती बाहेर निघुन गेले. घरी परतल्यावर भावी जावई आणि मुलगी दिसून आली नाही. दोघेही बाहेर गेले असतील. असा अंदाज तक्रारदार महिलेने बांधला. परंतु रात्री उशिरापर्यंत दोघेही परतले नसल्याने शेवटी पोलिसात धाव घेतली. याप्रकरणात अकोट फैल पोलिसांनी भावी जावयाविरूद्ध गुन्हा दाखल केला.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: