आकोट – संजय आठवले
दिनांक ६.१.२०२३ रोजी सायंकाळी ४ वाजताचे सुमारास पो. स्टे. आकोट ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख व स्टाफ हे ग्राम मुंडगाव येथे यात्रेमध्ये पेट्रोलिंग करीत असताना पोलीस निरीक्षक नितीन देशमुख ह्यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की, नामे अशोकसिंग दलसिंग आसोले हा त्याचे अन्नपूर्णा नगर, मुंडगाव येथील राहते घरी अवैधरित्या देशी दारू विक्रीकरिता बाळगून आहे.
त्यावरून पो. नि. देशमुख, सोबत महिला पोलीस नाईक ज्योती तेलगोटे, म. पो. शी. शालिनी सोळंके, पो. शी. सचिन कुलट, रुकेश हासुले ह्यांनी दोन पंचासह अशोकसिंग दलसिंग आसोले, वय ४९ वर्षे, रा. अन्नपूर्णा नगर मुंडगाव येथील राहते घरी छापा घालून देशी दारूच्या ९० मिलीच्या प्रत्येकी ३५ रु. किमतीच्या ६०१ बॉटल्स असा तब्बल २१०३४ रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. असून आरोपी ह्याचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कार्यवाही मा. उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोखर ह्यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. नितीन देशमुख, म पो ना ज्योती तेलगोटे, म पो शी शालिनी सोळंके, पो शी सचिन कुलट, पो शी रुकेश हासुले ह्यांनी केली.