सांगली – ज्योती मोरे
जत पोलीस ठाणे हद्दीतील विकास झाड टोळीला सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी आज दिले आहेत .
टोळी प्रमुख विकास विलास दुधाळ वय 26 वर्षे, श्रीकांत युवराज पाटील वय 25 वर्षे,लालासो उर्फ समाधान युवराज पाटील वय 22 वर्षे,अजय उर्फ अजितराव रावसाहेब दुधाळ वय 22 वर्षे,भारत उर्फ अमोल विलास दुधाळ वय 23 वर्षे, रवींद्र भाऊसो दुधाळ वय 25 वर्ष,
सर्वजण राहणार अंकले,तालुका जत,जिल्हा सांगली या टोळी विरुद्ध सन 2018 ते 2022 दरम्यान जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत रहावी यासाठी बेकायदेशीरपणे जमाव जमवून घातक हत्यारानिशी इच्छापूर्वक गंभीर दुखापत करणे, अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन शारीरिक संबंध ठेवणे,रस्त्यात अडवून शिवीगाळ मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देणे असे शरीराविरुद्धचे गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल आहेत.
सदरची टोळी ही कायद्यास न जुमानणारी असल्याने या टोळी विरोधात महाराष्ट्र कायदा कलम 55 अन्वये जतच्या पोलीस निरीक्षकांनी पोलीस अधीक्षकांकडे प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावानुसार अवलोकन करून त्यांची सलग सुनावणी घेऊन नैसर्गिक न्याय तत्त्वांचा व्यापक विचार करून या टोळीला सांगली आणि सोलापूर या दोन जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी दिले आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश वाघमारे, सहाय्यक पोलीस फौजदार सिद्धाप्पा रुपनर, पोलीस कॉन्स्टेबल दीपक गट्टे,पोलीस नाईक राज सावंत,महिला पोलीस नाईक वनिता सकट आदींनी केली आहे.