Saturday, July 27, 2024
spot_img
Homeगुन्हेगारीनांदेड मध्ये वॉकींग करणाऱ्या इसमांचे मोबाईल चोरी करणारे तीन आरोपी मुद्देमालासह ताब्यात...स्थानिक...

नांदेड मध्ये वॉकींग करणाऱ्या इसमांचे मोबाईल चोरी करणारे तीन आरोपी मुद्देमालासह ताब्यात…स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…

महेंद्र गायकवाड
नांदेड जिल्हयात सकाळी वॉकींग करणारे इसमांचे मोबाईल हिसकावण्याचे गुन्हयाचे प्रमाण वाढल्याने या प्रकारचे गुन्हे करणारे गुन्हेगार यांचा शोध करणेकामी जिल्हा पोलीस अधिक्षक कोकाटे यांनी स्थानीक गुन्हे शाखा नांदेड येथील पोलीस निरीक्षक यांना आदेश दिले होते.

स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी त्यांचे शाखेतील सपोनि रवी वाहुळे व पोउपनि आनंद बिचेवार यांची टिम तयार करुन नांदेड शहरातील सकाळी वाँकींग करणारे इसमांचे मोबाईल हिसकावून चोरी करणारे गुन्हेगार यांचा शोध घेवुन गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार दिनांक 26 मे रोजी सपोनि रवि वाहुळे व पोउपनि आनंद बिचेवार यांच्या टिमला नांदेड शहरात माली गुन्हयातील आरोपीचा शोध करुन नांदेड शहरात जबरी चोरी करणारे गुन्हेगारावर कार्यवाही करण्याचे आदेश देवुन रवाना केले.

सपोनि स्थागुशा रवि वाहुळे यांचे टिम ने नांदेड शहरातील गोपनिय माहीतगार यांचे कडुन माहीती घेवुन इसम नामे 1. अब्दुल मुजीब पि. अब्दुल हमीद वय 45 वर्षे रा. खडकपुरा नांदेड 2. शेख इरफान पि.शेख इस्माईल वय 36 वर्षे रा. दुलेशहा रहेमान नगर यांना ताब्यात घेवुन त्यांचे कडुन दोन मोबाईल किमती 20,000/- रुपयाचे जप्त केले. सदरचे मोबाईल हे पो.स्टे. नांदेड ग्रा. गुरन 110/2023 कलम 394,34 भादवी गुन्हयातील असल्याने त्यांना नांदेड ग्रामीण येथे पुढील तपास कामी देण्यात आले आहे.

तसेच पोउपनि स्थागुशा आनंद बिचेवार यांचे टिम ने नांदेड शहरातील गोपनीय माहीतगार यांचे कडुन माहीती घेवुन नांदेड शहरात सकाळी जबरी चोरी करुन मोबाईल लुटनारे टोळी मधील एक इसम नामे वैभव महेंद्र सुर्यतळे वय 19 वर्षे रा. काबरानगर नांदेड यास ताब्यात घेवुन त्यांचे कडुन एकुण 13 मोबाईल किंमती 2,72,000/- रुपये किमतीचे व गुन्हयात वापरलेली स्कुटी किंमती अंदाजे 50,000/- रुपयाचा असा एकुण 3,22,000/- रुपयाचे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याचे कडुन पो.स्टे. वजिराबाद गुरन 237/2024 कलम 392,34 भादवी व 238/2024 कलम 379,34 भादवी, पो.स्टे. भाग्यनगर गुरन 219/2024 कलम 392,34 भादवी व गुरन 222/2024 कलम 392,34 भादवी असे गुन्हे उघड झालेले असुन इतर मोबाईलचे गुन्हे बाबत तपास चालु असुन सदर आरोपीस पो.स्टे. वजिराबाद येथे पुढील तपास कामी हजर केले आहे.

सदरची कार्यवाही श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधिक्षक भोकर यांचे मार्गदर्शनाखाली, उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक स्थागुशा, सपोनि रवी वाहुळे, पोउपनि आनंद बिचेवार, पोलीस अमलदार माधव केंद्रे, गंगाधर कदम, गुंडेराव करले, संजीव जिंकलवाड, दिपक पवार, महेश बडगु, रंनधिरसिंह राजबंशी, गजानन बयनवाड, देवा चव्हाण, ज्वालासिंघ बावरी, मोतीराम पवार, तानाजी येळगे, मारोती मोरे, व चालक मारोती मुंडे, हेमंत बिचकेवार, शंकर केंद्रे सायबर सेलचे पोउपनि गंगाप्रसाद दळवी, अमलदार दिपक ओढणे, राजु सिटीकर यांनी पार पाडली असून सदर पथकाचे पोलीस अधीक्षक यांनी कौतूक केले आहे.

Mahendra Gaikwad
Mahendra Gaikwadhttp://mahavoicenews.com
Mahendra Gaikwad महेंद्र गायकवाड, पाटबंधारे नगर तरोडा (बु) नांदेड, मी गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात असून आजपर्यंत राजकीय, सामाजिक, क्राईम, अनेक विषयावर वृत्त लेखण केले आहे. अनेक पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: