Saturday, July 27, 2024
spot_img
HomeBreaking Newsपातुर | रेती माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला...पिंपळखुटा येथील पाच आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल...

पातुर | रेती माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला…पिंपळखुटा येथील पाच आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल…

निशांत गवई, पातुर

पातूर : चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत पिंपळखुटा येथे एका वृत्ताच्या पत्रकारावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना रविवार दि.२६ मे रोजीच्या दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास घडली, या हल्ल्यात पत्रकार राहुल नाजूकराव देशमुख हे गंभीर झाले, त्यांना उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे. रेतीची अवैध वाहतूक होत असल्याबाबतचे वृत्त प्रकाशित केल्याच्या कारणावरून पत्रकार राहुल देशमुख यांच्यावर सामोहिक पाच आरोपींनी लोखंडी रॉड व दगडाने जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पिंपळखुटा गौण खनिजांचे उत्खन करून अवैध वाहतूक होत असल्याचा अड्डा बनला आहे.या हल्ला प्रकरणी पत्रकार राहुल देशमुख यांच्या फिर्यादीवरून चान्नी पोलिसांनी पिंपळखुटा येथील आरोपी रवींद्र अनिरुद्ध महानकार, कैलास परसराम वाहोकार, परसराम गणपत वाहोकार, समीर अरविंद देशमुख, शुभम नागोराव देशमुख, यांच्याविरुद्ध भादवीच्या २९४,३२४,१४३,१४७,१४८,४२७,५०६ कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास ठाणेदार विजय चव्हाण व उपनिरीक्षक संजय कोहळे करीत आहे.

रेती माफियांना अभय कोणाचे?
पिंपळखुटा येथे महसूल विभागाच्या आशीर्वादाने सर्रास रात्रंदिवस गौण खनिजाचे उत्खनन करून अवैध वाहतूक सुरू असते, त्यामुळे रेती माफियावर कोणाचाही वचक नसल्याने पत्रकारावर भरदिवसा जीवघेणा हल्ला केला जाते, रेती माफियांना अभय कोणाचे आहे. असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पत्रकार संघटनेकडून हल्ल्याचा निषेध
रेती माफियांनी पत्रकार राहुल देशमुख यांच्यावर जीवघेणा हल्ला चढविल्याच्या घटनेचा पत्रकार संघटने कडून निषेध करून रेती माफियावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मारहाण करून गाडीत कोंबण्याचा प्रयत्न

पत्रकार राहुल देशमुख यांच्यावर आधी जीवघेणा हल्ला करण्यात आला, त्यानंतर त्याला गाडीत कोंबून अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु त्यांनी आरडाओरडा केल्याने आरोपींच्या तावडीतून त्यांची सुटका झाली,

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: