जिल्ह्याच्या कायापालट होण्यासाठी डॉ अभय पाटील यांना विजयी करा -गुलाबराव गावंडे…
जठारपेठ -रामदास पेठ परिसरातून डॉ अभय पाटील यांना मताधिक्य द्या- गजानन दाळू गुरुजी…
अकोला – महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उच्चशिक्षित उमेदवार व वैद्यकीय तज्ञ डॉ.अभय काशिनाथ पाटील यांना रामदास पेठ परिसरातून मताधिक्य देऊन संसदेत अकोल्याच्या या कर्तबगार शिलेदारास पाठविण्याचे आवाहन माजी राज्यमंत्री राष्ट्रवादी शरदचंद्र पवारचे प्रदेश पदाधिकारी गुलाबराव गावंडे यांनी केले.
माजी महापौर तथा काँग्रेसचे युवक नेते निखिलेश दिवेकर यांनी साकार केलेल्या प्रचार सभेत गुलाबराव गावंडे आपले आवाहन करीत होते. जठारपेठ परिसरातील दिवेकर वाचनालयात डॉ अभय पाटील यांची प्रचार सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
यावेळी माजी आ गजानन दाळू गुरुजी, महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अभय पाटील, माजी उपमहापौर निखिलेश दिवेकर, कपिल रावदेव, राष्ट्रवादीचे देवानंद टाले,दीपक ठाकूर, अजय चव्हाण आदी उपस्थित होते.
डॉ अभय पाटील अकोला लोकसभा मतदारसंघात सर्वोत्तम उमेदवार असून मतदारसंघात नवा बदल व विकासाची नवी पहाट म्हणून डॉ अभय पाटील यांना मोठ्या आनंदाने निवडून देऊन महानगरातील खोळंबलेल्या विकासास नव चालना देऊन नवा इतिहास घडविण्याचे आवाहन गुलाबराव गावंडे यांनी केले.
यावेळी माजी आ दाळू गुरुजी यांनीही आपले विचार व्यक्त करीत रामदासपेठ,जठारपेठ या सुसंस्कृत भागातील मतदार हा सुजान असून त्याला विकासाची जाणीव आहे. म्हणून यादृष्टीने आता मतदार नव्या दमाचे,कल्पक असे डॉ अभय पाटील यांना मोठ्या बहुमताने निवडून देणार असल्याची ग्वाही यावेळी दिली.
प्रास्ताविक माजी उपमहापौर निखिलेश दिवेकर यांनी करून हा परिसर माजी राज्यमंत्री व या परिसराचे विकासाचे शिल्पकार म्हटल्या जाणारे स्व अरुण दिवेकर यांच्या नावाने ओळखला जातो.त्यांच्या विकास कामाचे व कार्यक्षम कार्यपद्धतीची जाणीव अकोलेकर नागरिकांना असून डॉ अभय पाटील यांना घराघरातून भरघोस मते मिळवण्यासाठी आपण शर्तीचे प्रयत्न करणार असल्याची ग्वाही निखिलेश दिवेकर यांनी देऊन प्रचार अभियानाची माहिती दिली.
आपल्या मनोगतात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अभय पाटील यांनी विकासाच्या संदर्भातील आपले धोरण स्पष्ट करीत हे धोरण प्रत्यक्ष रुजवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. संचालन कपिल रावदेव यांनी तर आभार मनीष मिश्रा यांनी मानलेत. यावेळी महादेव मोदगे, लहू रोडे ,दिनेश खोब्रागडे, मिलिंद सातव, अमोघ कुलकर्णी, अमोल काळे समवेत जठारपेठ, रामदासपेठ परिसरातील मतदार,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.