नांदेड – महेंद्र गायकवाड
धर्माबाद -बनाळी चौक येथे झालेल्या चारचाकी वाहनाच्या अपघात प्रकरणी अद्याप हि पोलीस व महसूल विभागाकडून कसलीच कारवाई झाली नसल्याने या अपघाताची जोरदार चर्चा एकावयास मिळत असून अवैध मुरूम असलेल्या त्या हायवा गाडीवर कारवाई होणार की नाही..?
असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर महसूल विभाग मात्र झोपेचे सोंग घेत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या अपघात प्रकरणाकडे पोलीस व महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानी लक्ष द्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांतुन होत आहे
धर्माबाद तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात परवानगी नसतानाही मुरूम उत्खंनन चालू आहे. महसुल प्रशासन व पोलीस प्रशासन याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत आहे.रात्रंदिवस मुरूम, वाळूचे अवैध उत्खनन होत असताना महसूलचे अधिकारी, मंडळअधिकारी, तलाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण घेवाण करीत असल्याची चर्चा होत आहे.
एका मुरूम घेऊन जाणाऱ्या हायवा गाडीने एका चारचाकी वाहनास जबर धडक देऊन चारचाकी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. सुदैवाने या अपघातात जीवित हानी झाली नाही.अपघाताची चर्चा सर्वत्र होत असताना पोलीस व महसूल विभाग का कारवाई करीत नाही..?
या प्रकरणी आर्थिक तडजोड झाली काय..? हायवा गाडीच्या चालकावर व मालकावर गुन्हा का दाखल करण्यात आला नाही…? . अपघातग्रस्त गाडी मालकाने तक्रार दिली की नाही… असे अनेक प्रश्न समोर येत आहेत.अपघात झाला हे सर्वश्रुत असताना हि या प्रकरणी धडक देणाऱ्या गाडी चालकावर व मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यातून होत आहे.