नांदेड – महेंद्र गायकवाड
प्रतिवर्षी प्रमाणे महाविहार बावरीनगर दाभड नांदेड येथे याही वर्षी पौष पौर्णिमेला म्हणजेच दि. १३ व १४ जानेवारी २०२५ रोजी दोन दिवसीय अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. ‘भारतीय बौद्ध ज्ञानालंकार शिक्षण संस्था मुळावा’ चे संस्थापक अध्यक्ष पू. भदंत धम्मसेवक महास्थवीर यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद संपन्न होणार आहे.
दि . १३ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ५:३० ते ६:३० वा त्रिरत्न वंदना, परित्राण पाठ, ८:३० वा महाबोधि वंदना, ९:३० वा धम्म ध्वजारोहण व ९:४० पासून धम्म उपदेश होईल. दुपारी ठीक २:०० वा. महात्मा ज्योतिबा फुले पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत धम्मयान संचलन, सायं. ६.०० वा बुद्ध रुपाची प्रतिष्ठापना समारंभ,
सायं. ठीक ७.०० वा ३८ व्या अ. भा. बौद्ध धम्म परिषदेच्या उदघाटन समारंभास सुरुवात होईल. त्यानंतर धम्म देसनेस प्रारंभ होईल. परिषदेच्या दुसर्या दिवशी म्हणजेच दि. १४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९.०० ते ११.३० दरम्यान वधू – वर परिचय मेळावा व ११.३० वा सामूहिक मंगल परिणय विधी, ११.३० ते १२.३० व्यसन मुक्ती प्रतिज्ञा, १२.३० वा धम्म ज्ञान परीक्षा प्रमाणपत्र वितरण, दुपारी १ पासून रात्री १० वाजेपर्यंत पूजनीय भिक्खु संघातर्फे निरंतर धम्मदेसणा होईल.
या दोन दिवसीय अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेत भिक्खु अतुरालीय रतन थेरो, भिक्खु नेलुवेल आनंद थेरो, भिक्खु कोनगहदिनिये पलित थेरो, भिक्खु पुत्तलमे दियसेन थेरो, व इतर आठ भिक्खु तथा थायलंड या देशातून फ्रा येन्वीन थेरो, भिक्खु लकी, भिक्खु नऱ्ओंग तसेच जपान व दक्षिण कोरिया येथील भिक्खु गण, त्याचप्रमाणे भारतातून भिक्खु खेमधम्मो महाथेरो (मुळावा जि. यवतमाळ), भिक्खु महापंथ महाथेरो (नागपूर),
भिक्खु बोधिपालो महाथेरो ( छ. संभाजीनगर ), भिक्खु विशुद्धानंद महाथेरो(बुद्धगया), भिक्खु प्रज्ञादीप महाथेरो-महासचिव अ. भा. भिक्खु संघ बुद्धगया, भिक्खु डॉ. ज्ञानदीप महाथेरो(नागपूर), भिक्खु डॉ. एम. सत्यपाल थेरो, भिक्खु ज्योतिरत्न थेरो (नागपूर), भिक्खु एस. काश्यपायन थेरो (जयसिंगपूर), भिक्खु विणयबोधिप्रिय थेरो, भिक्खु धम्मानंद थेरो (बिदर),
भिक्खु महाविर्यो (अहमदपूर), भिक्खु ज्ञानरक्षित (छ. संभाजीनगर), भिक्खु धम्मशील (सारनाथ), भिक्खु बुद्धदत्त (बेंगलोर) आदी देश विदेशातील विद्वान भिक्खु सदर परिषदेमध्ये संमिलित होणार आहेत. सर्व जनतेने शुभ्र वस्त्र परिधान करत अधिकाधिक संख्येत सहभागी होऊन धम्म श्रवणाने लाभान्वित होण्याचे आवाहन धम्म परिषदेचे संयोजक महाउपासक डॉ. एस. पी. गायकवाड यांनी केले आहे.