Thursday, September 19, 2024
Homeराज्यतीन वर्षापासून रेंगाळलेले फेरफार प्रकरण एका झटक्यात निकाली - शेतकऱ्यांनी मानले उपविभागीय...

तीन वर्षापासून रेंगाळलेले फेरफार प्रकरण एका झटक्यात निकाली – शेतकऱ्यांनी मानले उपविभागीय अधिकाऱ्यांचे आभार…

शेतकऱ्यांचा आनंद पाहून एसडीओ चे डोळे पाणावले

मौदा (ताप्र) : एखादा आळशी, निकम्मा, कामचुकार अधिकारी असेल तर त्या अधिकाऱ्याविषयी चांगले बोलले जात नाही. उलट खालच्या दर्जाच्या भाषेत नानाविध प्रकारचे उतरवून बोलले जाते.

पण त्याच ठिकाणी एखादा हुशार, कर्तबगार, कर्तव्यदक्ष अधिकारी असेल तर तेच नागरीक त्या अधिकाऱ्यांना डोक्यावर घेऊन नाचल्या शिवाय राहत नाही. याचाच एक जिवंत उदाहरण म्हणजे मौदा येथील उपविभागीय अधिकारी सचिन गोसावी होय.

मौदा तालुक्यातील चाचेर -निमखेडा जिल्हा परिषद सर्कल मधील निसतखेडा येथील शेतकरी उदाराम भिलकर हे फेरफार प्रकरण साठी गेल्या तीन वर्षांपासून कामचुकार अधिकाऱ्यांमुळे कार्यालयात खेटा मारीत होते. यात त्यांना पैसा, वेळ व मानसिक त्रास झाला.

आजवर ज्या ज्या पदांवर काम केले तेथे आपल्या नावीन्यपूर्ण प्रशासकीय कार्याचा अनोखा ठसा उमटविणारे, त्यांच्या या प्रशासकीय कार्याची वेळोवेळी केंद्र व राज्य शासनाने दखल घेऊन त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केलेलें मौदा येथील उपविभागीय अधिकारी सचिन गोसावी यांनी चार्ज सांभाळल्यापासून प्रत्येक गोरगरीब व तसेच पट्टेधारकांचे सुद्धा विविध कामापासून चर्चेत असलेले उपविभागीय अधिकारी सचिन गोसावी यांची शेतकरी उदाराम भिलकर यांनी भेट देऊन फेरफार प्रकरण संबंधित चर्चा केली. व उपविभागीय अधिकारी सचिन गोसावी यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून संबंधित कागदपत्रांची तपासणी करून तीन वर्षांपासून रेंगाळलेले फेरफार प्रकरण तुरंत निकाली काढण्यात आले.

यावेळी शेतकरी उदाराम भिलकर यांचा आनंद गगनात मावेनासा झाला व शाल व श्रीफळ देऊन गोसावी यांचा आभार मानत सत्कार केला. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून गोसावी यांना सुखद अश्रू अनावर झाले. यावेळी प्रहार मौदा तालुका प्रमुख राहूल बावने, चाचेर चे ग्रामपंचायत सदस्य शैलेश कोपरकर, प्रहार शाखाप्रमुख राधेश्याम भोस्कर उपस्थित होते.

काम करणे हे माझे कर्तव्य आहे. कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे काम पूर्ण होऊनच तो समाधान आणि आनंद घेऊन जावे ही माझी प्राथमिकता समजतो.

सचिन गोसावी, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कार्यालय, मौदा

निसतखेडा गावातील पट्ट्यांचे प्रकरण दोन वर्षांपासून भूमी अभिलेख कार्यालयात प्रलंबित आहेत. तेथील अधिकारी झिले यांना बजावून सांगून अहवाल माझ्या कार्यालयात पाठवा म्हणणारे पहिले अधिकारी भेटले. असे अधिकारी आम्हाला लाभले हेच आमचे भाग्य समजतो.

राहुल बावणे, मौदा तालुका प्रमुख, प्रहार

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: