Monday, June 24, 2024
spot_img
Homeराज्यपेंच व्याघ्र प्रकल्पातील T53 वाघाला सुखरूपरित्या रेस्कु करून उपचार करण्यात आले...

पेंच व्याघ्र प्रकल्पातील T53 वाघाला सुखरूपरित्या रेस्कु करून उपचार करण्यात आले…

रामटेक – राजु कापसे

वनपरिक्षेत्रातील T53 नर वाघ दुसऱ्या वाघासोबत अधिवासाकरिता झालेल्या लढाईत जखमी झाला.अहवालानुसार, त्याची जखम नैसर्गिकरित्या बरी होत नव्हती. त्यामुळे त्याचे फोटो व व्हिडीओ क्लिपची तपासणी व पशुवैद्यकीय अधिकारी यांचे अभिप्राय मिळाल्यानंतर या वाघाला रेस्कु करण्याचा निर्णय पेंच व्याघ्र प्रकल्पाने घेतला.

आज, देवलापार (वन्यजीव) वनपरिक्षेत्रातील खुर्सापार बीटमधील कक्ष क्रमांक 509 मधील जुन्या पडक्या संरक्षण कुटीमध्ये T53 वाघ घुसला. त्याबाबत माहिती मिळताच विवेक राजूरकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, देवलापार (वन्यजीव),राहुल शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी चोरबाहुली, डॉ.निखिल बनगर, पशुवैद्यकीय अधिकारी, पेंच व्याघ्र प्रकल्प, जलद बचाव पथक,

विशेष व्याघ्र संरक्षण पथक यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि T53 नर वाघाला यशस्वीरित्या रेस्क्यू केले. वाघाच्या दोन्ही डोळ्यांच्या मधल्या भागात खोल जखम असल्याने त्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले तसेच पुढील नियमित उपचारासाठी वाघाला पिंजऱ्यात ठेवण्यात आले आहे.

सदर रेक्सू मोहीम डॉ. प्रभूनाथ शुक्ला, उपसंचालक, आणि पूजा लिंबगावकर, सहायक वनसंरक्षक, अवैध शिकार प्रतिबंधक कक्ष, पेंच व्याघ्र प्रकल्प, महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: