Monday, June 24, 2024
spot_img
Homeगुन्हेगारीपोलीस असल्याचे सांगून सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची अंगठी आणि सोन्याची चैन चोरली…असली पोलिसापुढे नकली...

पोलीस असल्याचे सांगून सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची अंगठी आणि सोन्याची चैन चोरली…असली पोलिसापुढे नकली पोलिसाला शोधण्याचे मोठे आव्हान…

नांदेड – महेंद्र गायकवाड

शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या गणेशनगर येथील ख़ुशी हॉस्पिटलजवळ एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास मी पोलीस असल्याचे सांगून चोरट्याने त्यांच्या गळ्यातली सोन्याची चैन आणि अंगठी हिसकावून पळ काढला त्यामुळे असली पोलिसांपुढे आता नकली पोलिसास शोधण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विशालनगर पावडेवाड भागात राहणारे सेवानिवृत्त कर्मचारी देविदास उर्फ बंडू साकळकर हे 17 मे रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कामारी तालुका हिमायतनगर येथील शेतीकडे जाण्यासाठी निघाले होते.

दरम्यान गणेशनगर येथील ख़ुशी हॉस्पिटल जवळ दबा धरून बसलेल्या चोरट्यांनी त्यांना अडवून मी पोलीस आहे असे म्हणत धक्काबुक्की करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि हातातील अंगठी हिसकावून सुमारे 65 हजाराचा ऐवज चोरून पोबारा केला आहे.

या प्रकरणी साकळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुरन 168/2024 कलम 170 भादवी कायद्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कव्हाळे हे करीत आहेत.शहरात चोरीचे प्रमाण दिवासोंदिवस वाढत आहे. या पूर्वीही पोलीस असल्याचे सांगून लुटण्याचे अनेक प्रकार शहरात व जिल्ह्यात घडले आहेत. त्यामुळे असली पोलिसापुढे नकली पोलिसांना शोधण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

Mahendra Gaikwad
Mahendra Gaikwadhttp://mahavoicenews.com
Mahendra Gaikwad महेंद्र गायकवाड, पाटबंधारे नगर तरोडा (बु) नांदेड, मी गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात असून आजपर्यंत राजकीय, सामाजिक, क्राईम, अनेक विषयावर वृत्त लेखण केले आहे. अनेक पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: