Saturday, October 26, 2024
Homeराज्यपातुर | गावंडगाव येथे युवकाचा संशयास्पद मृत्यू...

पातुर | गावंडगाव येथे युवकाचा संशयास्पद मृत्यू…

पातुर – निशांत गवई

पातुर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गावंडगाव येथील उमेश राठोड हा त्याच्या राहत्या घरात सकाळी मृत अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली. या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी चान्नी पोलीस स्टेशन ला दिली असता माहिती मिळतात चान्नी पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार तसेच डी वाय एस पी विपुल पाटील आणि उपनिरीक्षक गणेश महाजन आपल्या कर्मचाऱ्यासह घटनास्थळी पोहोचले.

उमेशच्या डोक्यामध्ये जबर मारहाण असल्याचे दिसून आल्याचे सांगण्यात येत आहे पोलिसांनी पंचनामा करून उमेश चा मृतदेह अकोला येथे पोस्टमार्टम करिता रवाना केला. मिळालेल्या प्राथमिक माहितीवरून उमेश चे व गावातील एका युवकाचे दारूच्या नशेमध्ये भांडण झाल्याची चर्चा आहे.

यावरून चान्नी पोलिसांनी एकास ताब्यात घेतली असून पोस्टमार्टम चे रिपोर्ट आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया होईल असे सांगण्यात आले सध्या चान्नी पोलिसांनी मृतक उमेश राठोड यांची अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे पुढील तपास चांणी पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे मात्र गावंडगाव परिसरात चर्चेला उधाण आले

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: