Saturday, July 27, 2024
spot_img
Homeराज्यरामटेक | कत्तलसाठी जनावरांची वाहनाच्या माध्यमातून चोरी...

रामटेक | कत्तलसाठी जनावरांची वाहनाच्या माध्यमातून चोरी…

रामटेक – राजु कापसे

रामटेक – कत्तलीसाठी जनावरांची वाहतुक केल्याप्रकरणी अरोली पोलीसांनी चालकावर गुन्हा दाखल केला बुधवार(दि.१५) सकाळी १० सुमारास रेवराल ते विर्शी मार्गावर येथे करण्यात आली. राजु दिंगाबर वंजारी(२९) वर्ष रा.तारसा ता. मौदा असा गुन्हा दाखल केल्याचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहीती नुसार अरोली पोलीस स्टेशन अंतर्गत हद्दीत मुखबिर व्दारे गुप्त सुचना द्वारे रेवराल ते विर्शी मार्गे कत्तलसाठी जनावरांची वाहतुक होत आहे. पोलीसांनी धनी गावजवळील स्मशानघाट जवळ नाकेबंदी केली समोरुन एक टाटा एस गाडी येतांना दिसली असता पोलीस पथकाने तातडीने धाव घेत सदर वाहनांची तपासनी केली असता गाडीत लहान मोठे असे एकुन ०७ जनावरे निर्दयीपणे कोंबलेली कत्तल करण्याकरीता नेत असल्याचे आढळले या प्रकरणी पोलीसांनी टाटा एस गाडी क्र. एम एच ४० सी एम ७०७५ ताब्यात घेवून वाहन व वाहना मधील सुटका केलेल्या जनावरांचे मुल्यांकन सुमारे एकुन ५ लक्ष ५५ हजार रुपये इतके होते.

पोलीसांनी सदर चालक राजु वंजारी यांच्यावर गुन्हा दाखल करुन सदरची कार्यवाही नागपुर ग्रामीण चे सिंघम पोलिस अधीक्षक श्री हर्ष पोद्दार, अप्पर पोलिस अधीक्षक डुमाळ, उप विभागीय अधिकारी रमेश बरकते यांच्या योग्य आदेश, मार्गदर्शनचे पालन करीत अरोली चे ठानेदार निशांत फुलेकर, पी एस आय सुशील सोनवाने, पठान टीकाराम जाधव, राजेंद्र पुळके, दत्ता बगमारे, सिपाई मंगेश निम्बार्ते, पोलीस अमलदार विक्की कोथरे, पोलीस हवालदार श्याम पोकळे, पोलीस हवालदार संदिप बाजनघाटे यांनी केली.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: