Monday, June 24, 2024
spot_img
HomeBreaking News12th Result | उद्या १२ विचा निकाल 'या' वेबसाईटवर बघाल...असा चेक करा...

12th Result | उद्या १२ विचा निकाल ‘या’ वेबसाईटवर बघाल…असा चेक करा निकाल…

12th Result : एकीकडे लोकसभा निवडणुकीची धूम सुरु असताना १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे. उद्या राज्यातील १२ वीच्या बोर्डाचा निकाल लागणार आहे. याआधी १२ वी CBSE ची निकाल लागला होता यामध्ये मुलींनी बाजी मारली होती तर उद्या ठीक १ वाजता निकाल लागले अपेक्षित आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून नुकताच बारावीच्या निकालाबद्दल अत्यंत मोठी घोषणा करण्यात आलीये. उद्या म्हणजेच 21 मे 2024 रोजी बारावीचा निकाल हा लागणार आहे. दुपारी 1 वाजता विद्यार्थी हे आपला निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहू शकणार आहेत. सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद होईल. यामध्ये नऊ विभागाची टक्केवारी जाहीर केली जाईल.

राज्यामध्ये 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 यादरम्यान बारावीच्या परीक्षा पार पडल्या. विशेष म्हणजे यंदा बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा आकडाही अत्यंत मोठा होता. उद्या ऑनलाईन पद्धतीने बारावीचा निकाल पार पडेल. खाली दिलेल्या वेबसाईटवर जाऊन विद्यार्थी आपला निकाल आरामात पाहू शकतात. दुपारी एकनंतर हा निकाल पाहता येईल.

mahresult.nic.in, results.gov.in., hscresult.mkcl.org, mahahsscboard.in आणि hsc.mahresults.org.in या साईटवर जाऊन तुम्ही निकाल पाहू शकतात. यासाठी विद्यार्थ्यांकडे परीक्षा क्रमांक असणे आवश्यक आहे. यासोबतच तिथे जन्म तारीख किंवा आईचे नाव टाकावे लागेल. त्यानंतर सबमिटचे बटन क्लिक केले की, तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर असेल.

14 लाख विद्यार्थ्यांनी यंदा बारावीची परीक्षा दिलीये. जवळपास सर्वच बोर्डांचा निकाल लागल्याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या निकालाची प्रतिक्षा होती. यंदा बारावीच्या निकालाचा टक्का वाढण्याची देखील शक्यता आहे. नऊ विभागांमध्ये बारावीची परीक्षा ही पार पडलीये. या निकालात मुले बाजी मारतात की ,मुले हे उद्या समजेल.

गेल्या काही वर्षांपासून बारावीच्या निकालात मुली बाजी मारताना दिसतात. यंदा मुले वरचढ ठरतात का? हे पाहण्यासारखे ठरणार आहे. उद्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी हे बारावीच्या निकालाची विभागीय टक्केवारी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करतील. दहावीच्या निकालाचे कामही अंतिम टप्प्यात आल्याचे सांगितले जातंय.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: