रामटेक : सायरन्स आणि मध्य प्रदेश टुरिझम यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार २२/०९/२०२४ ला पेंच नॅशनल पार्क, टूरीया – खवासा येथे मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती. वाघांचे संरक्षण आणि मोगली लँड विषयी आदर करावा हे याचे उद्देश्य होते. वेग – वेगळ्या राज्यातून ५०० ते ६०० धावकांनी यात सहभाग नोंदविला. स्पर्धा ५,१० आणि २१ की.मी. साठी होती.
रामटेक वरून सृष्टी सौंदर्य चे ३४ आणि मातृका फाऊंडेशन चे ६ धावक सहभागी झाले होते. यातील काही धावकांना अतुल कुमार चौकसे यांचे प्रशिक्षण लाभत आहे ज्यामुळे चांगली पेस ठेऊन धावणे आणि त्याविषयीचे समुपदेशन असते. अतुल कुमार यांच्यामुळेच प्रोत्साहन मिळत असल्याचे या धावकांनी सांगितले. या स्पर्धेत ऋषिकेश किंमतकर यांनी ५०+ वयोगटात प्रथम क्रमांक, कुणाल दमाहे यांनी ३५ वर्षाच्या खालील १० की.मी. मध्ये प्रथम, समर्थ हायस्कूलच्या आरुषी शरणागत आणि योगिनी शरणागत यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला.
उल्लेखनीय आहे की रामटेक वरून जाणारे धावक वयाच्या ५ ते ६५ वर्षांपर्यंतचे होते ज्यामुळे इतर नागरिकांना पण प्रेरणा मिळेल. सुदृढ आणि निरोगी आयुष्यासाठी दिनचर्या कशी असावी या साठी अश्या स्पर्धांमध्ये भाग घेणं नितांत गरजेचं असते आणि जीवनशैली संबंधित आजारांना दूर ठेवण्याचा उत्तम उपाय म्हणून याकडे पाहिले जाते.रामटेकरामटेक