Sunday, October 13, 2024
Homeराज्यरामटेक मध्ये जागतिक फार्मासिस्ट दिवसावर 36 रक्तदात्यानी केले रक्तदान...

रामटेक मध्ये जागतिक फार्मासिस्ट दिवसावर 36 रक्तदात्यानी केले रक्तदान…

राजु कापसे
रामटेक

रामटेक तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने समाज हिताचे कार्यक्रम रक्तदान व रक्त तपासणी शिबिर घेऊन 25 सप्टेंबर ला फार्मासिस्ट दिवस साजरा केला. सकाळी पोलिस उपविभागीय अधिकारी रमेश बरकते आणि किमया हॉस्पिटल चे संचालक डॉ निनाद पाठक यांनी दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन केले. उत्तम कामगिरी करणाऱ्या मा. राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्राप्त पदमेश अतुल किंमतकर यांचा दुपट्टा आणि गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला.

अमेया पॅथॉलॉजी लॅब चे संचालक अंकुश ठवरे यांच्या द्वारे 70 व्यक्तींच्या रक्त तपासण्या करण्यात आल्या. लाइफ लाईन ब्लड बँक यांच्या सहयोगाने सकाळी 10 वाजेपासून दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण 36 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले कर्तव्य बजावले. शिबिराला ओम नमो चे राष्ट्रीय अध्यक्ष विजय हटवार, नप माजी सदस्य सुमित कोठारी,अनिल वाघमारे,नत्थु घरजाळे यांनी सदिच्छा भेटी दिल्या. रामटेक तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन तर्फे जनतेचे आभार मानून स्वास्थ लाभाच्या शुभकामना देण्यात आल्या. शिबिर यशस्वी करण्यासाठी संघटनेच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम केले.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: