Sunday, October 13, 2024
Homeखेळतिडके महाविद्यालयाची कबड्डी संघ विजयी...

तिडके महाविद्यालयाची कबड्डी संघ विजयी…

राजु कापसे प्रतिनिधी

नागपूर : नुकत्याच पार पडलेल्या मौदा तालुका शालेय क्रिडा स्पर्धा कबड्‌डी मुले १९ वर्षाखालील स्पर्धेमध्ये श्रीमती राजकमल बाबुराव तिडके महाविद्यालय मौदाचा अंतीम सामना जनता विद्यालय मौदा सोबत झाला. सामना अटितटीचा झाला तिडके महाविद्यालयाच्या कर्णधार आयुष डोंगरे याने उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन करून आपल्या संघाला विजयी खेचून आणला. प्रणित बागडे, समीर बुचके, अक्षय तिजारे, रितेश साठवणे, हर्ष बागडे, अर्जुन चव्हान व आर्यन डोंगरे यांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले.

तिडके महाविद्यालयाचे संचालक प्रसन्ना तिडके यांनी खेळाडूंचे कौतुक केले व पुढील खेळा करिता शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय भक्ते क्रिडा संचालक डॉ. हरिश मोहीते व प्रा. सुरेश आंबीलडुके यांनी खेळाडूचे कौतुक केले व पुढील स्पर्धे करिता शुभेच्छा दिल्या आहेत.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: