Tuesday, September 17, 2024
Homeराज्यरामटेक पोलीसांनी रेतीने भरलेला ट्रक पकडला...

रामटेक पोलीसांनी रेतीने भरलेला ट्रक पकडला…

रामटेक – राजु कापसे

रामटेक पोलीस मध्य रात्री पेट्रोलिंग करीत असतांना मुखबिरव्दारे मिळालेल्या माहीतीनुसार तुमसर रोडवर रेतीची अवैध वाहतुक होत असल्याची गुप्त माहीती मिळाली. त्याआधारे तुमसर महामार्गावर नाकाबंदी करुण दरम्यान तुमसर कडुन येणार्‍या ट्रक क्र. एम एच ४० सीएम ४१९८ ला थांबुन पाहणी केली. सदर ट्रक मधे १५ ब्रास रेती मिळाली.

चौकशीत ट्रक चालक नामे अनिल सोनटक्के रा. शिवनी(एमपी) हा विना परवाना अवैधरित्या रेती ची वाहतुक करीत अशी माहीती दिली. आरोपी च्या ताब्यातुन एम एच ४० सीएम ४१९८ रुपये २००००००/- व १५ ब्रास रेती ही रुपये ४५०००/- असे एकुण रुपसे २०४५००० चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर चालक व मालक यांच्या विरुद्ध अप क्र.११२/२०२४ कलम ३७९, १०९ भादवी सह कलम ४८(८) महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम अन्यवे गुन्हाची नोंद करण्यात आली आहे. सदर कार्यवाही रामटेक पोलीस निरीक्षक प्रशांत काळे, पो. उप निरीक्षक हरिश्चंद्र मोरे , पो. ना. प्रफुल रंधई , पो. शि. सुहास बावणकर आदीनी केली.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: