Saturday, October 26, 2024
Homeराज्यरामटेक | नवसाला पावनारी मॉ बम्लेश्वरी देवी...

रामटेक | नवसाला पावनारी मॉ बम्लेश्वरी देवी…

रामटेक – राजू कापसे

तुमसर – भंडारा मार्गावरील अंबाळा टेकडी येथील मॉ बम्लेश्वरी देवी ही भक्तांच्या नवसाला पावनारी देवी म्हणुन प्रख्यात आहे. येथे १५ ऑक्टोंबर ला घटस्थापना झाली. रोज सकाळ – संध्याकाळ महाआरती तथा धार्मिक कार्यक्रम होत असतात. भक्तगणांच्या माहितीनुसार या देवीला २३ वर्षांचा इतिहास आहे.

हे जागृत देवस्थान असुन येथे काही भक्त ५ मंगळवार तर काही ११ मंगळवार नवस करीत असतात. येथील देवी भक्तांच्या नवसाला पावनारी असुन मनोकामना पुर्ण करणारी आहे. तेव्हा येथे दुर दुरुन भक्तगण दर्शनासाठी येतात. २४ ऑक्टोंबर ला भक्तगणांकडुन महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तेव्हा ज्यास्तीत ज्यास्त भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: