Monday, July 22, 2024
spot_img
Homeराज्यरामटेक | आपला दवाखाना मध्ये रक्तदान शिविर...

रामटेक | आपला दवाखाना मध्ये रक्तदान शिविर…

रामटेक – राजु कापसे

उपजिल्हा रुग्णालय रामटेक व तालूका आरोग्य कार्यालय रामटेक यांच्या संयुक्त विद्य‌माने स्थानिय गांधी चौक येथील आपला दवाखाना मध्ये सोमवार 8 जुलाईला रक्तदानाचे शिबिर आयोजन केले. रक्तदान शिविर मध्ये 16 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्त संकलनाचे काम डागा स्मृती शासकीय रक्तपेढी नागपुर यानी केले.

या वेळी प्रामुख्याने जिएमसीचे डॉ. संजना टोंगब्राम , डागा हास्पीटलचे पीआरओ प्रविण बुधकर व डॉ. स्वप्नील चौधरी, तालूका आरोग्य आधिकारी डॉ. स्मीता काकडे, रामटेक उपजिल्हा वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय वाघमारे, करवहीचे वैद्दकिय अधिकारी डॉ. अभिषेक शिलनकर, आपला दवाखाना रामटेकचा वैद्दकिय अधिकारी डॉ.अदिती चव्हान उपस्तित होते.

तालुका आरोग्य अधिकारी स्मीता काकडे यांनी मार्गदर्शनपर रक्तदानाचे महत्व सांगीतले व म्हणाल्या की रक्तदान केल्याने दुसऱ्याना जिवनदान मिळते. सामाजिक बांधीलकि जपुन स्वच्छेने रक्तदान करा. परिचारिका वंदना झाडे, अधिपरिचारक अभिषेख टांगले, टेक्नीशियन नागनाथ मोरे, उत्पला धारगावे, विजया तलमले, वासु परिहार, इश्वर बेलखेडे , हॉस्पीटल कर्मचारी हिमांशु, चोपकर वासु परिहार, सहित आदिने रक्तदान शिबिर यसस्वी ते करीता पर्यत्न केले.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: