Saturday, December 28, 2024
Homeमनोरंजनकालिदास दिनानिमित्त विदर्भ साहित्य संघाचे कालिदास स्मारकावर कवि सम्मेलन...

कालिदास दिनानिमित्त विदर्भ साहित्य संघाचे कालिदास स्मारकावर कवि सम्मेलन…

रामटेक – राजु कापसे

आषाढस्य प्रथम दिवसे या मेघदूतातील श्लोकावरुन आषाढाचा पहिला दिवस कालिदास दिन म्हणून 6 जुलाई ला सायंकाळी 5 वाजता कालिदास स्मारक येथे विदर्भ साहित्य संघ शाखा रामटेकच्या वतीने कवि सम्मेलन्याचे आयोजन केले होते.

यात कविनी सहभाग घेतला. कविनी कालीदासाला साजेसे पावसावर व अन्य प्रसंगावर जोरदार कविता प्रस्तुत केल्या. कार्यक्रमाची अध्यक्षता विदर्भ साहित्य संघ रामटेक शाखाचे दिपक गिरधर यानी केली. या वेळी प्रामुख्याने प्रा. डॉ. गिरीष सपाटे, ऋषि किंमतकर, संतोष ठकरेले, वेदश्री बारोकर, राजेंद्र पाणतावने, प्रा. डॉ. सावण धर्मपुरीवार, शिल्पा ढोमने, माला पारधी, उमाताई काठिकार, प्रा. डॉ. जगदिश गुजरकर, राजेंद्र बावनकुळे, राहुल शामकुवर, डॉ. गजेंद्र बरबटे, सुभाष चव्हाण सचिन चण्हान, जाधव , दिपक रोकडे हे कवि उपस्तित होते.

अध्यक्षीय भाषणांत प्रा. दिपक गिरधर म्हणाले की विदर्भ साहित्य संघ गेल्या 25 वर्षापासून कालिदास स्मारकावर प्रथम आषाढे दिवसावर कालिदास दिनानिमित्य कवि सम्मेलन आयोजित करीत आहेत. हिच परपंरा सर्व कविनी पुढेही चालू ठेवावी. या निमिताने महाकविला अभिवादन करता येतो व नवोदितांना वाव मिळतो. प्रस्तावना, संचालन . डॉ. सावण धर्मपुरीवार, संचालन राकेश खलासने व आभार वेदश्री बारोकर यानी केले.

कुलगुरु कालिदासांच्या वास्तव्याचा साहित्यीक वारसा लाभलेल्या रामटेकमध्ये कालिदास दिनी महाकविच्या आठवणी जपण्यासाठी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
जेथे महाकवि कालिदासांनी विरह खंडकाव्य मेघदूतची रचना केली। त्या ठिकाणी राज्य शासनाने भव्य व देखणे कालिदास स्मारक उभारले व त्याच परिसरात जगातील सर्वात मोठ्या ओमची निर्मिती केली. रामटेक येथे कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ उभारण्यात आले.

हे विद्यापीठ कालिदासांच्या साहित्याला सातत्यपुर्ण उजाळा देते। कालिदास दिनाचे औचित्य साधून समर्थ कनिष्ठ महाविद्याय आणि सृष्टी सौंदर्य परिवाराने झाडे लावा पर्यावरण वाचवा” या शिर्षकाखाली कालिदास ट्रेक व”कालिदास सीड बाॅल” प्रकल्प हाती घेतला आहे. यामध्ये गडमंदीर ते नागार्जुन ट्रेकिंग मार्गात ,टेकडीवर विद्यार्थी दहा हजार सीडबाॅल टाकले. प्रा.नंदेश शेळके यांच्या नेतृत्वात हा उपक्रम सकाळी ८ ते १० या वेळात राबविला गेला.

सकाळी दहा ते १२ वाजताच्या दरम्यान कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठातील विद्यार्थी गड मंदीर परिसरातील कालिदास स्मारकात मेघदूत पाठ अंतर्गत मेघदूतचे वाचन केले. दुपारी ३ वा.विद्यापीठाच्या सभागृहात वर्धा हिंदी विश्व विद्यापीठाचे माजी कुलगुरु व कालिदासांच्या साहित्याचे गाढे अभ्यासक प्रो.गिरीश्वर मिश्र यांचे कालिदास या विषयावर विशेष व्याख्याण आयोजित करण्यात आले  होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: