अमरावती शहरात श्रींच्या भक्तांसाठी आनंदघन निवासी श्रींचे विश्रांती स्थानांतर्गत एकादश मुखोद्गत पारायणकर्त्यांची सामुहिक एकादश पारायण सोहळा दिनांक ०२-०१-२०२५ ते १३-०१-२०२५ पर्यंत आयोजित केला असून हा सोहळा मालती सेलिब्रेशन हॉल, मनोर मांगल्य मंगल कार्यालया समोर, एम.आय.डी.सी रोड. अमरावती येथे मोठ्या थाटात संपन्न होणार आहे. हा सोहळा तब्बल १२ दिवस चालणार असून प्रत्येक दिवशी राज्यातील विविध भागातून आलेले सन्माननीय पारायणकर्ते मुखोद्गत पारायण करणार आहेत.
कार्यक्रमाची रुपरेषा अशी असेल
पारायण आरंभ :- सकाळी ठीक ०८ वाजता.
सकाळी :- ०७-३० वा. उपस्थितांचे चहापान
सकाळी :- १०.०० वा. अल्पोपहार
क्षण :- १२.०० वा. पेय (दुध/ताक)
दुपारी :- ३.३० वा. पारायण समाप्ती नंतर सामुहिक आरती आणि त्यानतंर सामुहिक भोजन प्रसाद…
सन्माननीय मुखोद्गत पारायणकर्ते
१) गुरुवार दि. ०२/०१/२०२५ श्री विद्याधर जोशी, पुणे. यांचे पहिले पुष्प
२) शुक्रवार दि. ०३/०१/२०२५ श्री मिलींद ठोंबरे, अकोला. यांचे दुसरे पुष्प.
३) शनिवार दि. ०४/०१/२०२५ श्री प्रकाश पटवर्धन, तळेगाव दाभाडे, पुणे. यांचे तिसरे पुष्प.
४) रविवार दि. ०५/०१/२०२५ श्री डॉ. गजानन खासनिस, पुणे. यांचे चौथे पुष्प.
५) सोमवार दि. ०६/०१/२०२५ सौ. विद्याताई पडवळ, ठाणे. यांचे पाचवे पुष्प.
६) मंगळवार दि. ०७/०१/२०२५ सौ. शितलताई पुंड, अमरावती. यांचे सहावे पुष्प.
७) बुधवार दि. ०८/०१/२०२५ कु. सुरभी ढगे, पुणे भाग – ०१. यांचे सातवे पुष्प.
८) गुरुवार दि. ०९/०१/२०२५ कु. सुरभी ढगे, पुणे भाग – ०२. यांचे सातवे पुष्प.
९) शुक्रवार दि. १०/०१/२०२५ श्री/सौ. जयंत मराठे, कराड. यांचे आठवे पुष्प.
१०) शनिवार दि. ११/०१/२०२५ श्रीमती साधना मराठे, कराड. यांचे नववे पुष्प.
११) रविवार दि. १२/०१/२०२५ सौ. कल्पनाताई माऊसकर नाशिक, यांचे दहावे पुष्प.
१२) सोमवार दि. १३/०१/२०२५ चि. आर्यन हळवे, पुणे. यांचे अकरावे पुष्प.
विशेष :- शनिवार दि.०४-०१-२०२५ रोजी सन्मानिनय श्री डॉ. गजानन खासनिस यांचे प्रवचन.
विषय :- समर्थांचे मनाचे श्लोक आणि मनाचे आरोग्य वेळ सायंकाळी ६.३० वाजता.
विशेष सुचना परायण वाचक सद्भक्तांसाठी
१) पारायण सोहळ्यात ज्या सद्भक्तांना आरती प्रसाद आणावयाचा असल्यास त्या संदर्भात श्री अनिल घड्याळजी / श्री मनाहेर देशपांडे यांच्याशी (प्रसाद आणावयाच्या एक दिवस आधी) पारायण स्थळी संपर्क करून निश्चित करावे. ऐन वेळेवर कोणीही कोणताही प्रसाद आणु नये. २) पारायण सोहळ्यात ज्या सद्भक्तांना अन्नदानासाठी आर्थिक सहकार्य करावयाचे (एका दिवसाच्या भोजनप्रसाद खर्च) असल्यास पारायण तारखेच्या आधी श्री. अंबादास बनारसे / श्री. विलास पांडे यांचेशी संपर्क करावा. अन्नदानासाठी कोणीही किराणा, धान्य, इतर साहित्य आणु नये. भाजीपाला, फळं इत्यादि काहीच आणू नये. ३) अल्पोहारासाठी कोणतेही साहित्य आणु नये, त्यास येणारा जो खर्च अपेक्षित आहे, त्यासाठी श्री. नितीन कुन्हेकर / श्री. नरेंद्र गणोरकर यांच्याशी एक दिवस आधी संपर्क साधावा.
विशेष :- गुरूवार दि.०२-०१-२०२५ सोहळ्याचा श्री गणेशा श्रींच्या मूर्ती सह ग्रंथ दिंडी ने संपन्न होणार आहे. यात बालक- बालिकांचासहभाग राहणार आहे. श्रींच्या विश्रांती स्थानाहून सकाळी ६.३० वा. ग्रंथ दिंडी सुरवात होऊन मालती सेलीब्रेशन सभागृहात विसर्जित होणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
सौ. संध्याताई नांदेडकर-९६०७८९६४६२. सौ. अस्मिताताई केवले- ९५२७८५४८६०. श्री. विलास पांडे – ९४२०७२१४८९