Monday, July 22, 2024
spot_img
Homeराज्यवैद्यकीय अधिकारी गट ब पदोन्नतीच्या प्रतीक्षेत...

वैद्यकीय अधिकारी गट ब पदोन्नतीच्या प्रतीक्षेत…

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आयुक्त कार्यालयांच्या वेळ काढू भूमिकेमुळे पदोन्नतीस विलंब…

निशांत गवई

अकोला जिल्ह्यातील 25 वैद्यकीय अधिकारी यांच्यासह राज्यातील जवळपास 700 वैद्यकीय अधिकारी हे मागील 23 वर्षापासून पदोन्नती बाबत वाट पाहत आहेत. शासनाने 2022 मध्ये सर्व वैद्यकीय अधिकारी गट ब यांच्या पदोन्नती करिता प्रस्ताव मागितले होते. तेव्हापासून आतापर्यंत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाकडून सहा स्मरणपत्र भेटूनही आयुक्त कार्यालय हे वेळ काढू धोरण अवलंबित आहे. आणि त्यामध्ये लक्ष न देता वेळोवेळी नवीन नवीन बदल करून नवीन नवीन फॉरमॅट टाकून एकच माहिती पुन्हा पुन्हा मागवत आहे.

त्यामुळं प्रक्रियेस विनाकारण विलंब करत आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. राज्यातील माननीय मंत्री महोदय ,माननीय खासदार महोदय, तसेच शेकडो मां.आमदार महोदयांनी शासनास विनंती पत्र देऊनही आयुक्त कार्यालयाच्या आड मुठ्या धोरणामुळे सध्या वैद्यकीय अधिकारी गट ब यांच्या पदोन्नती चे तारीख पे तारीख पत्र काढून फक्त वेळ काढू धोरण आयुक्त कार्यालयाकडून दिसून येत आहे. “कोणत्याही संवर्गासाठी पदोन्नती हे एक ऊर्जा स्त्रोतसाचे काम करत असते परंतु शासनाने वैद्यकीय अधिकारी यांना मागील 23 वर्षापासून दूर ठेवल्यामुळे आमच्यावर अन्याय होत आहे “. – महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट ब महासंघ

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: