Thursday, June 20, 2024
spot_img
Homeदेश-विदेशMalaysia helicopters crash | मलेशियामध्ये दोन नौदलाच्या हेलिकॉप्टरचा असा झाला अपघात...सर्व १०...

Malaysia helicopters crash | मलेशियामध्ये दोन नौदलाच्या हेलिकॉप्टरचा असा झाला अपघात…सर्व १० क्रू मेंबर्स ठार…घटनेचा पहा व्हिडीओ

Malaysia helicopters crash : मलेशियामध्ये मंगळवारी सकाळी एक दुःखद घटना घडली. येथे नौदलाचे दोन हेलिकॉप्टर एकमेकांवर आदळले आणि अपघात झाला. हे हेलिकॉप्टर रॉयल मलेशियाच्या नौदलाच्या एका कार्यक्रमाची तयारी करत होते. यावेळी दोघेही हवेत एकमेकांवर आदळले. या घटनेत हेलिकॉप्टरमधील 10 क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला.

मलेशियाच्या नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, लुमुत नौदल तळावर सकाळी 9.30 वाजता ही घटना घडली. अपघातानंतर सर्व मृतांचे मृतदेह लुमुट आर्मी बेस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. याठिकाणी त्यांची ओळख पटल्यानंतर मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.

वृत्तानुसार, एका हेलिकॉप्टरचा रोटर (पंखा) दुसऱ्या हेलिकॉप्टरच्या रोटरला धडकल्याने हा अपघात झाला आणि दोघेही स्टेडियमच्या जमिनीवर पडले. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: