Saturday, July 13, 2024
spot_img
Homeराज्यभोई समाजाचा डॉ.अभय पाटील यांना निवडून आणण्याचा निर्धार...

भोई समाजाचा डॉ.अभय पाटील यांना निवडून आणण्याचा निर्धार…

अकोला – महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उच्चशिक्षित उमेदवार व वैद्यकीय तज्ञ डॉ अभय काशिनाथ पाटील यांना निवडून आणण्याचा निर्धार बहुसंख्य समाजासमवेत भोई समाजाने घेतला असून संपूर्ण समाजाने त्यांच्या प्रचारात सहभाग घेत विजयाचा कौल मतदारांना मागितला.अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था ने या संदर्भात डॉ अभय पाटील यांना बिनशर्त पाठींबा जाहीर करीत त्यांच्या हातून मतदार संघातील सर्व जाती जमातीचा विकास होवो अशी आशा व्यक्त केली.

अकोला लोकसभा मतदारसंघात भोई समाजाच्या अनंत प्रलंबित समस्या असून त्या समस्यांचे अद्यापही निराकरण झाले नाही. समाज,शिक्षण, रोजगार, सामाजिक विकास, राज्य व केंद्राच्या योजना पासून वंचित राहिला असून समाजाचा सत्तारूढ भाजपाने केवळ मतदानाना पुरता उपयोग करून समाजाला दुधातील माशी प्रमाणे दूर फेकण्याचा प्रयत्न केला आहे.

डॉ अभय पाटील यांच्या उमेदवारीने समाजाची आशा पल्लवीत झाली असून त्यांच्या विजयामुळे समाजाच्या विकासाचा मार्ग सुकर झाला आहे.माहविकाच आघाडीचे उमेदवार डॉ अभय पाटील यांचे सामाजिक विचार, सर्वधर्म समभाव, तळागाळातील जाती-जमातींना सोबत घेऊन काम करण्याची जिद्द,तळमळ बघता डॉ अभय पाटील यांनाच भोई समाज ताकतीनिशी निवडून आणणार असल्याची ग्वाही अ. भा. भोई समाज सेवा संस्थेचे जिल्हाध्यक्ष संजय मेसरे,जिल्हा उपाध्यक्ष।संतोष सुरजुसें समवेत डॉ मोहन माहोरे, जगन्नाथ कोल्हे गुरुजी, आत्माराम म्हात्रे आदी पदाधिकाऱ्यांनी दिली.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: