मुंबई – गणेश तळेकर
” बदामाची गोष्ट ” या नाटकाच्या निमित्ताने मंगळवार दि. १२ मार्च २०२४. रोजी ” शिवाजी नाट्य मंदिर ” मध्ये ” अखिल भारतीय भंडारी महासंघ ” चे अध्यक्ष – श्री. नविनचंद्र बांदिवडेकर साहेब खास गोव्यातून नाटक पाहण्यासाठी आले होते.
नाटकाच्या मध्यांतरात त्यांचा सन्मानपूर्वक ” बाळगंगा पडवणे श्रमसंघ ” चे अध्यक्ष – प्रकाश दरवेशी आणि नाट्यसमीक्षक – सु. बा. सरपडवळ यांच्या हस्ते यतोच्छ सत्कार करण्यात आला.
त्याच बरोबर कवी- विसूभाऊ बापट यांचाही सन्मान करण्यात आला आणि श्री. स्वामी समर्थ भक्तभक्त- अविनाश स्वामी यांचा सुध्दा बाळा चौकेकर व किशोर वेल्हे यांच्या हस्ते गौरवपुर्क सत्कार करण्यात आले.
त्याचबरोबर नाटकातील सर्व कलाकारांचा ट्रॉपी देऊन सत्कार करताना समूहाने आनंद व्यक्त केला तेव्हा सदर नाट्यगृहातील रसिक प्रेक्षकांनी हा आनंद पुरेपूर घेऊन ” बदामाची गोष्ट ” नाटकाला छान प्रतिसाद दिला हे टाल्यांच्या कडकडाटात नाटक पाहताना जाणवले! – अशोक शिंदे