Friday, July 12, 2024
spot_img
Homeराज्यकिड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल पातूर तालुक्यातून प्रथम...

किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल पातूर तालुक्यातून प्रथम…

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाचा निकाल घोषित…

पातूर – निशांत गवई

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात पातूर तालुक्यातून प्रथम येण्याचा मान पातुरच्या किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल मिळवला आहे.

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात पातूर तालुक्यातून प्रथम येण्याचा मान पातुरच्या किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल मिळवला आहे.

पुस्तकी ज्ञानसोबत विद्यार्थ्यांना कृतिशील शिक्षण मिळावे यासाठी विविध उपक्रम प्रभाविपने राबविण्यात सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या होत्या. या अभियानात तालुक्यातील एकूण 179 शाळांनी सहभाग घेतला होता. त्यानुसार उपक्रमाचे मूल्यांकन करून तालुका स्तरावर तीन क्रमांक काढण्यात आले आहेत.

यामध्ये पातूर येथील किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल ने प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. शाळेचे उपक्रम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे व कार्यकरी संचालिका सौ. ज्योत्स्ना गाडगे यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे, शीतल कवडकार, नितु ढोणे, प्रिती धोत्रे, लक्ष्मी निमकाळे, निकिता भालतिलक, तृप्ती पाचपोर, नयना हाडके, अविनाश पाटील, नरेंद्र बोरकर, रविकिरण अवचार, हरिष सौंदळे, योगिता देवकर, शानू धाडसे, प्रियंका चव्हाण, अश्विनी आवटे, श्रीकृष्ण आवटे, बजरंग भुजबटराव, रुपाली पोहरे, शुभम पोहरे आदींनी परिश्रम घेतले.

या यशाचे कौतुक शिक्षण विभागाच्या गटशिक्षणाधिकारी शोभा मेहर, समावेशित तज्ज्ञ अमोल तायडे यांच्यासह केंद्रप्रमुख, विषय शिक्षक यांनी केले. प्रथम येण्याचा मान मिळवल्याबद्दल पालक, विविध सामाजिक संस्थेकडून शाळेचे अध्यक्ष व शिक्षक वृंदाचा सन्मान करण्यात येत आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: