गोंदिया – राजेशकुमार तायवाडे
गोंदिया जिल्याचा वन वैभव समजल्या जाणाऱ्या सारस पक्ष्याचे संवर्धन करणारे सारस मित्र.वन विभाचे बिट गार्ड.सारस पक्षी संवर्धन करणाऱ्या ग्राम पंचायती यांचा सारस सवर्धन करणाऱ्या सेवा संस्थेच्या वतीने गोंदियाच्या हॉटेल जिंजर या ठिकाणी जिल्हाधिकारी तसेच पक्षी मित्रांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
संपूर्ण महाराष्टात गोंदिया भंडारा जिल्यात तसेच गोंदिया जिल्याला लागून असलेल्या बालाघाट जिल्यात सारस पक्षी अस्तितावत असून सेवा संस्थेच्या वतीने तसेच वन विभागाच्या वतीने मागील 12 वर्षा पासून सारस पक्ष्याचे संवर्धन करण्यात येत असून गोंदिया जिल्यात सध्याच्या घडीला 35 च्या वर तर भंडारा जिल्यात 5 सारस पक्षी आहेत तर बाजूला लागून असलेल्या बालाघाट जिल्यात 45 च्या वर सारस पक्ष्याचे आदिवास असून सारस पक्षी हा धानाच्या शेतात आदिवास करित असून एक सारस पक्षी हा दिवसाला 5 किलो च्या वर धान शेतात असलेले कीटक खात असतो त्यामुळे शेकऱ्यांच्या शेतात किटकाचे प्रमाण कमी होते मात्र ज्या शेतात सारस पक्षी राहतो त्या शेतकऱ्याचे थोड्या प्रमाणात धान पिकाचे नुकशान व्ह्याचे मात्र सारस पक्षी जगला तर शेतकरी जगेल या संदर्भात शेकऱ्यान मध्ये जण जागृती करण्याच्या उद्देशाने जे सारस मित्र शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची समजूत घालतात सोबतच सेवा संस्थेतर्फे सारस पक्ष्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी अमूल्य योगदान देणाऱ्या स्वयंसेवक सारस मित्रांचा तसेच ज्या पत्रकारांनी सारस पक्षी संवर्धना संदर्भात बातम्या प्रकाशित करून सेवा संस्थेला आणी वन विभागाला मदत केली अस्या सारस मित्र पत्रकारांचा देखील या सारस मित्र संमेलनात सत्कार करण्यात आला.
सेवा संस्थेचे अध्यक्ष सावन बाहेकार आणी त्यांची टीम गोंदिया जिल्यात 2005 पासून सारस संवर्धणासाठी काम करीत असून त्यांच्या या कार्याची दखल स्वतः मुबंई उच्च न्यायाल्याच्या नागपूर खंड पिठाणे घेत 2021 मध्ये सारस संवर्धनासाठी सु मोठो याचीका दाखल केली असून गेल्या काही वर्षाचा विचार केला असता सारस पक्ष्याची संख्या कमी होत असल्याने वन विभागाने आणी कृषी विभागाने सारस संवर्धन करणाऱ्या सेवा संथाना घेऊन सारस संवर्धना साठी काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यामुळे भविष्यात नक्कीच दुर्मिळ होत जातं असलेल्या सारस पक्ष्याची संख्या महाराष्ट्रातील गोंदिया जिल्यात वाढल्या शिवाय राहणार नाही हे मात्र निश्चित.