Wednesday, November 6, 2024
Homeराज्यरामटेक | कार पिकअप चा भीषण अपघात अपघातात दोघांचा मृत्यू...

रामटेक | कार पिकअप चा भीषण अपघात अपघातात दोघांचा मृत्यू…

रामटेक – राजु कापसे

रामटेक बायपास तुमसर मार्गावर रात्री १ ते २ वाजताच्या सुमारास एका कार व पिकअप च्या धडकेत एकाचा घटनास्थळी तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

प्राप्त माहितीनुसार, पवनी वनविभाग कार्यालयातील क्षेत्र सहाय्यक स्वप्नील जाधव आपल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यासह कार क्रमांक एम,एच, ३३ ए ४१३२ हिने सहकारी मित्राच्या लग्न सभारंभाच्या कार्यक्रमाला गोंदिया येथे गेले होते.

लग्न समारंभाहून परत येताना रामटेक तुमसर बायपास मार्गावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या एम,पी, २८ जि ४७७१ क्रमांकाच्या अशोक लिलँड पिकअप ला त्यांच्या कारची जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की, यात कारचा समोरील भागाचा चुराडा झाला असून पिकअप चा मागील भाग वेगळा झाला.

हा अपघात जवळपास रात्री १ ते २ वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. या अपघातात पवनी वनविभागात कार्यरत असणारे क्षेत्र सहाय्यक स्वप्नील जाधव वय ३५ वर्ष यांचा घटनास्थळी मृत्यू झाला तर सोबत असेलेले मनोज इनवाते वय ३५ वर्ष याचादेखील उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

अन्य प्रदीप सूर्यवंशी वय ३५ वर्ष व निकेश कुंभलकर वय ३० वर्ष. या दोन व्यक्तींची स्थिती गंभीर असल्याने त्यांना नागपूर मेडिकल येथे पाठविण्यात आले असून घटनास्थळावरून पिकअप चालक फरार झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे.

फिर्यादी चंद्रभाण बाजिराव परतेती यांच्या तोंडी रिपोर्ट वरुन पिक क्र. एम एच २८ अ ४७७१ चालकाविरुध्द अप क्र.५० / कलम २७९ , ३३७, ३३८, ३०४ (अ) भा.द.वी सह कलम १८४, १३४, १७७ मो.वा. का अन्वये गुन्हा नोंद केला असुन पुढील तपास पो.नि. हृदयनारायण यादव सा.यांच्या मार्गदर्शनात स.पो.नि. स्वाती यावले या करत घटनेचा अधिक तपास रामटेक पोलीस करीत आहेत.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: