Thursday, July 18, 2024
spot_img
Homeमनोरंजनभाव माझ्या मनातला | म्यूजिक मंत्र च्या मंचावर ख्यातनाम दिग्दर्शक श्री राजदत्त...

भाव माझ्या मनातला | म्यूजिक मंत्र च्या मंचावर ख्यातनाम दिग्दर्शक श्री राजदत्त सर यांनी साजरा केला…

आपला ९२ वा वढदिवस आणि उलघडला आपल्या मनातील भाव

मुंबई – गणेश तळेकर

मराठी चित्रपट सृष्टितिल ख्यातनाम दिग्दर्शक श्री राजदत्त सरंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून म्यूज़िक मंत्र ने गप्पा गोष्टी आणि सरांच्या चित्रपटातील गाणी सादर करून व त्यांचा चित्रपट सृष्टितिल प्रवासाचा आढावा घेत एका आगळया वेगळया पद्धातिने त्यांचा जन्मदिवस सरांच्या नातेवाईक व मित्र परिवारा सोबत साजरा केला.

या कार्यक्रमात म्यूजिक मंत्र च्या आयोजक डॉक्टर स्मिता डोंगरे यांनी राजदत्त सरांची मुलाकत घेतली त्यात सरांनी त्यांच्या आयुष्यतील अनेक प्रसंग प्रेक्षकांना सांगीतले. एवढ्या थोर व्यक्तिची साथ आणि आशिर्वाद लाभला आम्ही धन्य झालो अशी प्रतिक्रिया म्यूजिक मंत्र चे आयोजक डॉक्टर स्मिता डोंगरे आणि रमेश पूजारी यांनी व्यक्त केली.

पारंपरिक पदधतीने औक्षण व केक कापून वाढदिवस सजरा करण्यात आला या प्रसंगी राजदत्त सरांची कन्या भक्ति मायाळू ज्या एक प्रसिद्ध एडिटर आहेत त्यांनी म्यूज़िक मंत्राच्या सम्पूर्ण टीम चे आभार मानले तर राजदत्त सरांनी मला खूप इमोशनल केले आणि तुमच्या प्रेमाने मी विरघळून गेलो हा कार्यक्रम मी कधीही विसरू शकणार नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

या संगितसंध्या मधे म्यूज़िक मंत्र चे गायक गायिकानी बहरदार गाणी सादर केली त्यात सुनिल खोबरेकर, विजयानंद तांबे, श्रुतिका तांबे,विश्वास सावंत,ललिता शेट्टी,संजय मांगवे,प्रमिला धनु,प्रगति वैद्य,अनिता कांबळे,नूतन सैल,कैलाश माहुर,लीना भगत,शिल्पा शेलार ,अर्चना सावंत,रमेश पूजारी आणि डॉक्टर स्मिता डोंगरे यांनीही गाणी सादर केली.

तर शोभा पूजारी दशरथ नाईक, नरेन , वत्सला,यांचे सहकार्य लाभले.क्षितिज पटाडे,मिहिर गायकवाड,सुनिल खोबरेकर,विजू तांबे,दिलीप कोळी यांनी तांत्रिक बाजू सांभाळली. मुक्ता इवेंट्स एंड हॉस्पिटैलिटी चे श्री संतोष परब यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: