Tuesday, July 16, 2024
spot_img
Homeगुन्हेगारीभरधाव एस.टी.बस ने दुचाकी चालकाला चिरडले...

भरधाव एस.टी.बस ने दुचाकी चालकाला चिरडले…

तुमसर-भंडारा राष्ट्रीय महामार्गावरील खरबी येथिल घटना…

भंडारा – सुरेश शेंडे

तुमसर आगाराची तुमसर-भंडारा-नागपुर जलद एस. टी.बस क्रमांक एम. एच १३ सि..यु. ९३६० तुमसर वरून मोहाडी कडे भरधाव जाणाऱ्या एस.टी बसने विरूध्द दिशेने येणाऱ्या हीरो एच. एफ डिलक्स कंपनीच्या दुचाकी क्रमांक एम. एच ३६ए.डी.५३९० या क्रमांकाच्या दुचाकीला ज़ोरदार धडक दिली.व दुचाकी चालक जागिच ठार झाल्याची घटना ५ जुलै रोजी तुमसर-भंडारा राष्ट्रीय महामार्गावरील खरबी येथे सायंकाळी सहा वाजता दरम्यान घडली.

जिवन गुलाब गोमासे (३०) रा.खरबी असे एस. टी अपघातात ठार झालेल्या विवाहीत तरुणांचे नाव आहे. घटनेच्या दिवशी सायंकाळी घरुन दुचाकीने जिवन हा घरच्या बकऱ्या शोधायला मोहाडी कडे जात असताना पावसाला सुरुवात झाली असल्याने मोहाडी मार्गे दुचाकीने घरी परत येत असताना. तुमसर कडुन विरूध्द दिशेने येणाऱ्या तुमसर आगाराची तुमसर -भंडारा-नागपुर ह्या जलद बसने दूचाकी चालकाला जोरदार धडक दिली.त्यात दुचाकी चालक जागिच ठार झाला.

सदर घटनेची माहिती होताच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत गर्दी केली होती. दरम्यान सदर घनटेची माहीती मोहाडी पोलीसांना देण्यात आली.मोहाडी पोलीस घटनास्थळी दाखल होत सदर घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मोहाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिवन हा विवाहीत तरुण होता.त्याच्या मृत्यू पश्चात पत्नी,आई,वडील,भाऊ,
असा बराच मोठा आप्त गोमासे परिवार आहे. सदर घटनेचा पुढील तपास मोहाडी ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप पुल्लरवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दुधकावरा,बिट अंमलदार भोंगाडे,कुभलकर आदी करीत आहेत.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: