Saturday, July 13, 2024
spot_img
HomeSocial Trendingअनुष्काने घेतलं ट्रॅक्टर चालविण्याचे प्रशिक्षण...

अनुष्काने घेतलं ट्रॅक्टर चालविण्याचे प्रशिक्षण…

अनुष्का चालवतेय ट्रॅक्टर

मुंबई – गणेश तळेकर

आपल्याला विविधांगी आणि आव्हानात्मक भूमिका साकारण्याची संधी मिळावी असं प्रत्येक कलाकाराला वाटत असतं.त्यामुळे अशा भूमिकांची ऑफर आली की कलाकारांचा उत्साह व्दिगुणीत होतो. त्या भूमिकेचं सोनं करण्यासाठी कलाकार वाट्टेल ती मेहनत घेतो. आता हेच बघा ना…‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘भूमिकन्या- साद घालते निसर्गराजा’ या मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अनुष्का बोऱ्हाडेने मालिकेतल्या भूमिकेची गरज म्हणून ट्रॅक्टर चालवण्याचे प्रशिक्षण घेतले.

मुख्य अन्नदाता म्हणून ज्याची ओळख आपल्याला आहे तो म्हणजे आपला बळीराजा. ‘भूमिकन्या’ ही मालिका एका सामान्य शेतकऱ्याच्या आयुष्यावर आधारित आहे. मालिकेत अनुष्का लक्ष्मीच्या भूमिकेत असून लक्ष्मी ही कर्तव्य आणि प्रेम यांचा समन्वय साधत कणखर ‘भूमिकन्या’म्हणून आपल्या वडिलांच्या पाठीशी कशी खंबीरपणे उभी राहते ? याची रंजक कथा ‘भूमिकन्या -साद घालते निसर्गराजा’या मालिकेत आहे.

भूमिकेची गरज म्हणून ट्रॅक्टर कसा चालवायचा हे तिने शिकून आपल्या भूमिकेची तयारी केली आहे. सोबत नांगर धरणे, गोफण फिरवणे या गोष्टीही तिने शिकून घेतल्या. शेतकरी कुटूंबात लहानाची मोठी झाल्याने लहानपणापासून शेतीची काम बघितल्याने या भूमिकेसाठी त्याचा तिला फायदा झाला. या भूमिकेत शिरण्यासाठी तिने घतलेली मेहनत नक्कीच वाखाणण्याजोगी आहे. ही मेहनतच भूमिकेला वेगळ्या उंचीवर नेत असल्याचं मत अनुष्का व्यक्त करते.

आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना अनुष्का सांगते की, ‘भूमिकन्या -साद घालते निसर्गराजा’ या मालिकेच्या निमित्ताने मला ही संधी मिळाली. मी ही भूमिका एन्जॉय केली. माझी ही भूमिका प्रेक्षकांनाही चकीत करणारी असेल हे नक्की. श्रुती मराठे आणि गौरव घाटणेकर यांच्या ब्लॅक कॉफी प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेली‘भूमिकन्या – साद घालते निसर्गराजा’ ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होते.

मालिकेत अभिनेत्री अनुष्का बोऱ्हाडे सोबत अभिनेता आनंद अलकुंटे, गौरव घाटणेकर प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. मालिकेचं दिग्दर्शन अवधूत पुरोहित यांचे आहे.‘जमीन कसून तिचा मान राखणारी… एका राजाची जशी राजकन्या, तशी माझी भूमिकन्या’! असं म्हणत, आपल्या मातीतली नवी कोरी गोष्ट प्रेक्षकांना चांगली भावतेय. तेव्हा पहायला विसरू नका ‘भूमिकन्या – साद घालते निसर्गराजा’ सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता सोनी मराठी वाहिनीवर.

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: