हेमंत जाधव, बुलढाणा
कापुस-सोयाबिन भाववाढ प्रश्नावर स्वाभिमानीने अकोला-ब-हाणपुर, मध्यप्रदेशात जाणारा महामार्ग अडवला…राज्यभर पुकारलेल्या चक्काजाम आंदोलनात स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात वरवट बकाल येथे शेतकऱ्यांचा रास्तारोको सुरू…
शेतकरी विरोधी सरकारचा निषेध करण्यासाठी संतप्त शेतकऱ्यांनी कापुस-कांदे रस्त्यावर फेकून महामार्ग अडवला…शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी, गाड्यांच्या लांबच रांगा लागल्या असल्याने पोलिस प्रशासन हतबल…
शेतकऱ्यांच्या कापूस -सोयाबिन-कांदा भाववाढ प्रश्नावर सरकारने निर्णायक भूमिका घ्यावी अन्यथा अधिवेशन दरम्यान मंत्र्यांच्या गाड्या फोडु.प्रशांत डिक्कर यांचा सरकारला ईशारा…
कापुस-सोयाबिन भाव वाढ, बोंडअळी मुक्त कपाशी बियाणे, शेतमजुरांसाठी स्वतंत्र शेतमजूर कल्याण महामंडळ, रखडलेली अतिवृष्टीची नुकसान भरपाई, विमा कंपनिने रोखलेला पिक-विमा,कृषी पंपाला दिवसाला विज व कृषी कनेक्शनवर वाढलेला लोड समतोलसाठी नविन डि पी वाढविणे, उसाला एकरकमी एफआरपी, प्रोत्साहनपर अनुदानाची थकित रक्कम,नाफेड मार्फत शासकीय कांदा खरेदी सुरू करावी, लंपीआजाराने मृत्यु झालेल्या पशु मालकांना भरपाई द्यावी व बुलढाणा येथे आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी इत्यादी मागण्यांसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत.