Friday, July 19, 2024
spot_img
HomeMarathi News Todayबुलढाणा जिल्ह्यातील वरवट बकाल येथे शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा प्रशांत डिक्कर सह शेकडो...

बुलढाणा जिल्ह्यातील वरवट बकाल येथे शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा प्रशांत डिक्कर सह शेकडो शेतकरी रस्त्यावर…

हेमंत जाधव, बुलढाणा

कापुस-सोयाबिन भाववाढ प्रश्नावर स्वाभिमानीने अकोला-ब-हाणपुर, मध्यप्रदेशात जाणारा महामार्ग अडवला…राज्यभर पुकारलेल्या चक्काजाम आंदोलनात स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात वरवट बकाल येथे शेतकऱ्यांचा रास्तारोको सुरू…

शेतकरी विरोधी सरकारचा निषेध करण्यासाठी संतप्त शेतकऱ्यांनी कापुस-कांदे रस्त्यावर फेकून महामार्ग अडवला…शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी, गाड्यांच्या लांबच रांगा लागल्या असल्याने पोलिस प्रशासन हतबल…

शेतकऱ्यांच्या कापूस -सोयाबिन-कांदा भाववाढ प्रश्नावर सरकारने निर्णायक भूमिका घ्यावी अन्यथा अधिवेशन दरम्यान मंत्र्यांच्या गाड्या फोडु.प्रशांत डिक्कर यांचा सरकारला ईशारा…

कापुस-सोयाबिन भाव वाढ, बोंडअळी मुक्त कपाशी बियाणे, शेतमजुरांसाठी स्वतंत्र शेतमजूर कल्याण महामंडळ, रखडलेली अतिवृष्टीची नुकसान भरपाई, विमा कंपनिने रोखलेला पिक-विमा,कृषी पंपाला दिवसाला विज व कृषी कनेक्शनवर वाढलेला लोड समतोलसाठी नविन डि पी वाढविणे, उसाला एकरकमी एफआरपी, प्रोत्साहनपर अनुदानाची थकित रक्कम,नाफेड मार्फत शासकीय कांदा खरेदी सुरू करावी, लंपीआजाराने मृत्यु झालेल्या पशु मालकांना भरपाई द्यावी व बुलढाणा येथे आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी इत्यादी मागण्यांसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: