Saturday, July 27, 2024
spot_img
Homeराज्यधनादेश अनादरण प्रकरणातून निर्दोष मुक्तता…

धनादेश अनादरण प्रकरणातून निर्दोष मुक्तता…

आकोट – संजय आठवले

आकोट न्यायालयाचे न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी तथा दुसरे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर विनायक रेडकर यांनी धनादेश अनादरण प्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे.

एका व्यवहाराचे कारणातून फिर्यादी मोहन अवधुत गावंडे यांनी आरोपी रितेश सुकलाल बन्नावडे रा.आकोट यांचे विरूध्द रू. १,००,०००/- इतक्या रकमेचे धनादेश अनादरण प्रकरण फौजदारी खटला कं. ६८६/२०१७ व्दारे आकोट न्यायालयात दाखल केले.

सदरहू प्रकरणात आरोपीचे विधीज्ञ दिपक. डि. वर्मा यांनी बचाव पक्षाची बाजू मांडली. त्यावर फिर्यादी पक्षाने आपला युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंच्या विस्तीर्ण युक्तीवादानंतर आरोपीवर अपराध सिद्ध झाला नाही. त्यामुळे न्यायाधिश विनायक रेडकर यांनी आरोपी रितेश सुकलाल बन्नावडे यांची निर्दोष मुक्तता केली.

सोबतच फिर्यादी यांचे वरील रकमेचे मागणी प्रकरण खारीज केले आहे. सदरहू प्रकरणात आरोपी तर्फे आकोट येथील विधीज्ञ दिपक डि. वर्मा यांनी कामकाज पाहीले.

Sanjay Athavle
Sanjay Athavlehttp://mahavoicenews.com
नमस्कार, मी संजय आठवले रा. खानापूर वेस आकोट जिल्हा अकोला. मी मागील तीस वर्षांपासून पत्रकारिता करित आहे. समाजातील असामाजिक तत्त्वे, अराजकता, भ्रष्टाचार, अन्याय या विरोधात आवाज उचलण्याचा माझा जन्मताच स्वभाव आहे. त्यातूनच महाविद्यालयीन जीवनात वाचनाशी माझा जवळून संबंध आला. आणि तेव्हा निर्माण झालेली वाचनाची आवड आजतागायत कायम आहे. त्यानेच मराठी भाषेचे बऱ्यापैकी ज्ञान झाल्याने वाणिज्य पदवीधर झाल्यानंतर मी छंद म्हणून पत्रकारिता करू लागलो. त्यातील शोध पत्रकारितेत मला अधिक रुची आहे. अनेक रहस्य उलगडून जगापुढे आणणे मला अत्यंत आवडते. आता मी महा व्हाईस न्यूज चा कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहे. महा व्हाईस न्यूजने पत्रकारितेचा फ्रीहँड दिल्याने विविध स्तरातील, विविध क्षेत्रातील जोखमीची पत्रकारिता मी करू शकत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: