Saturday, July 13, 2024
spot_img
Homeराज्यमाजी मंत्री जानकर यांना समता परिषदे तर्फे प्रतिमा भेट...

माजी मंत्री जानकर यांना समता परिषदे तर्फे प्रतिमा भेट…

मालेगाव (वाशिम) – चंद्रकांत गायकवाड

माजी मंत्री तथा आमदार महादेवराव जानकर यांना ता 4 मार्च रोजी सकाळी 10.00 वाजता त्यांची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सत्कार अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदे तर्फे करण्यात आला.

आ जानकर वाशिम येथील कार्यक्रमाला जात असताना त्यांचा सत्कार अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रा अरविंद गाभणे यांनीप्रतिमा देऊन केला. प्रा गाभणे यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला
यावेळी बोलताना आ जानकर म्हणाले की आपली ताकद आपण आगामी निवडणुकीत दाखवून दिली पाहिजे.

आगामी निवडणूकित मूळ ओ बी सी ,बारा बलुतेदार यांनी आपली शक्ती ओ बी सी च्याच मागे उभी केली पाहिजे त्यासाठी समता परिषद व रासप नी एकत्रित पणे कार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पश्चिम विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा अरविंद गाभणे ,रासपचे जिल्हा अध्यक्ष माधव दळवी पाटील जिल्हा सचिव संदीप गावंडे रिसोड तालुकाप्रमुख नितीन बनसोड ,समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष सेवाराम आडे ,विलासराव रोकडे ,जिल्हा सचिव विठ्ठल भागवत तालुका अध्यक्ष कपिल भालेराव ,

तालुका प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत गायकवाड ,यशवंतराव हिवराळे ,सुभाष बळी ,रवी बळी ,माजी सैनिक अशोकराव घुगे ,गजानन कुटे डीगम्बर राऊत गोपाल पातळे जावेद भवानिवाले ,व्हॉइस ऑफ मीडिया चे जिल्हा अध्यक्ष भागवत मापारी रासप चे माजी जिल्हा अध्यक्ष दीपक तिरकेरिसोड तालुका अध्यक्ष पंजाब गव्हाणे आदी उपस्थित होते,

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: